राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विघटनानंतर बारामतीमध्ये 12-12 चा विसर पडला का? असा प्रश्न लोक विचारत आहे. राष्ट्रवादीचे वयोवृद्ध नेते, बारामतीचे भाग्यविधाते, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीमध्ये शुभेच्छा देण्यास चढाओढ लागायची. समाज माध्यमे, प्रसार माध्यमे, विविध सामाजिक-राजकीय कार्यक्रमांची रेलचेल असायची. मात्र आता बारामतीकरांना 12-12 चा विसर पडलाय, अशी आफवा बारामतीत पसरली आहे. कुठेही सामाजिक उपक्रम नाहीत, राजकीय उपक्रम नाहीत, असे का झाले? याची चर्चा बारामतीमधील मतदार करत आहेत.
राष्ट्रवादी पक्षाच्या विघटनानंतर ताईंच्या नेतृत्वात अनेकांना पद वाटप आणि जबाबदाऱ्या देण्यात आल्या. परंतु, 12- 12 ला या पदाधिकाऱ्यांनी आपण कुचकामी असल्याचे स्पष्ट केले आहे. तालुक्यात व शहरात हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यक्रम घेण्यात आलेत. साहेबांच्या विचारांचा आणि नेतृत्वाचा प्रसार व प्रचार करण्याची नामी संधी उपलब्ध असताना ही संधी वाया घालवल्याची चर्चा राजकीय निरीक्षक करत आहेत. ताईंच्या संघटन क्षमतेला दादांनी शह दिल्याचे या वरून स्पष्ट होत आहे. येथून पुढे बारामतीचे 12 चे 12 वाजताना गाजणार का? अशी आफवा राजकीय वर्तुळात जोरात चर्चेली जात आहे.