बारामती, 25 जूनः बारामती नगर परिषदेच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक 2022 च्या मतदार याद्या आज, शनिवार (25 जून) रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहे. प्रारुप मतदार याद्या या बारामती नगर परिषद हद्दीतील अस्तित्वात असलेल्या प्रभाग क्रमांक 1 ते 20 मध्ये विभागणी करण्यात आल्या आहेत.
सदर मतदार याद्या या नगर परिषदेच्या http://baramatimunicipalcouncil.in या संकेतस्थळावरुन डाऊनलोड करता येणार आहे.
प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांवर लेखनिकाच्या चुका, दुसऱ्या प्रभागातील चुकून अंतर्भूत झालेले मतदार, संबंधित प्रभागाच्या क्षेत्रातील विधानसभा मतदार यादीत मतदारांची नावे असूनही प्रभागाच्या मतदार यादीत नावे चुकून वगळण्यात आलेल्या मतदाराची नावे या सुधारणा करता येतील.
यासह प्रसिद्ध मतदार याद्यांवर सूचना व हरकती 25 जून 2022 ते 1 जुलै 2022 पर्यंत कार्यालयीन वेळेत नगर परिषदेच्या कार्यालयात दाखल करायच्या आहेत. मुदतीनंतर आलेल्या हरकती/सूचना यांचा विचार केला जाणार नाही. या बाबतची माहिती बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले आहे.