पुणे जिल्ह्यावर दाट धुक्यांची चादर

पुणे, 08 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. या अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. तर आता हा अवकाळी पाऊस गेला आहे. अशातच शेतकऱ्यांसमोर धुक्याचे संकट उभे राहिले आहे. आज पहाटेपासूनच पुणे शहरासह जिल्ह्यांतील अनेक गावांत दाट धुके पडल्याचे दिसत होते. बंगालच्या उपसागरातून येणार्‍या ओलाव्यामुळे हे धुके निर्माण झाले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. या धुक्यांमुळे अनेक शेती पिके आणि फळबागांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तर पुणे जिल्ह्यात येत्या काही दिवसांत दाट धुके पडतील अशी शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

https://twitter.com/vineet_tropmet/status/1732946837869605032?s=19



दरम्यान, येत्या 8 ते 10 दिवसांत पुण्यासह राज्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने वर्तविला आहे. पुढील 8 ते 10 दिवसांत पुण्यासह राज्यात कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाचे अधिकारी के एस होसळीकर यांनी दिली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केले आहे. तसेच पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये येत्या 4 ते 5 दिवसांत किमान तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची अपेक्षा आहे. तर पुण्यासह जिल्ह्यात रात्री देखील थंडी वाढणार असल्याचे के एस होसळीकर यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1732974236594323588?s=19

https://twitter.com/PravinKulkarn/status/1732944355844149675?s=19



दरम्यान, गेल्या एक-दोन दिवसांपासून पुणे शहरासह जिल्ह्यात धुके पडल्याचे चित्र दिसत आहे. तर पुणे जिल्ह्यांतील बहुतांश गावांत आज पहाटेपासून दाट धुके पडले होते. हे धुके इतके दाट होते की, त्यामुळे काही अंतरावरचे ही काहीचं दिसत नव्हते. याबरोबरच पुण्यासह जिल्ह्यातील अनेक गावांत सध्या थंडीचा कडाका वाढला आहे. त्यामुळे अनेक नागरिक आज सकाळी थंडी आणि पडलेल्या धुक्यांचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी अनेक नागरिक सकाळी या थंडीच्या वातावरणात फेरफटका मारताना दिसले. तसेच पुणे शहरामध्ये अनेक टेकड्या आहेत. या टेकड्यांवर आता मॉर्निंग वॉक करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *