फुटाणे खाण्याचे गुणकारी फायदे

सर्दी-खोकलापासून बचाव
फुटाण्यात मुबलक प्रमाणात फायबर असते. फायबरमुळे पचन क्षमतेत वाढ होते. पचन क्षमता वाढल्याने रोग प्रतिकारक शक्तीही चांगली वाढते. यामुळे वातावरणातील बदलामुळे होणारे सर्दी-पडसे आणि खोकला या आजारांपासून बचाव होतो.

हृदयाच्या आरोग्यास उत्तम
फुटाण्यात पोटॅशियमचे प्रमाण खूप असते, जे हृदय विकारापासून बचाव करते. हृदय संबंधित समस्यांकरीता गूळ फुटाणे हे आरोग्यदायी असते. तसेच गूळ फुटाणे खाल्ल्याने शरीरास ऊर्जा मिळते. तसेच मेटाबॉलिक रेटही सुधारतो. तसेच रक्ताभिसरणही सुधारते.

स्त्रियांसाठी आरोग्यदायी
फुटाण्यामध्ये झिंक (जस्त) अधिक प्रमाणात असतात. झिंक हे त्वचा उजळण्यासाठी खूप लाभदायी असतात. झिंक हे त्वचेस तजेला प्रदान करतात. फुटाण्याच्या नियमित सेवनाने स्त्रियांच्या सौंदर्यात वाढ होते. तसेच मासिक पाळीत फुटाणे आणि गूळ खाल्ल्याने ते आरोग्यदायी राहते. तसेच बाळांतपणानंतर स्त्रीला फुटाणे आणि गूळ खाणे आरोग्यदायी राहते.

हाडांसोबत दात मजबूत होतात
फुटाण्यासोबत गूळ खाल्ल्याने शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते. तसेच फुटाण्यात कॅलशियम आणि फॉस्फरसचेही प्रमाण अधिक असते. यामुळे फुटाण्यासोबत गूळ खाल्ल्याने हाडांसह दातही मजबूत होतात.

पाठ दुखीचा त्रास कमी होतो
फुटाण्यात योग्य प्रमाणात प्रथिने आढळतात. यामुळे पाठ दुखीपासून मुक्तता मिळते. तसेच अशक्तपणाचीही समस्या दूर होण्यास मदत होते.

स्मरणशक्ती सुधारते
फुटाणे आणि गूळ खाल्ल्याने बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते. यामधील विटॅमिन बी स्मरणशक्ती वाढवण्यास खूप मदत करते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *