दरम्यान, अध्यक्षपदासाठी सुनील धुमाळ तर उपाध्यक्षपदासाठी प्रतिभा सोनवणे यांचाच अर्ज दाखल झाला होता. यामुळे या दोघांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी 13 पैकी 12 संचालक उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस. पी. गोलांडे यांनी काम पाहिले.
सभासदांच्या हितासोबतच संस्थेचा नावलौकिक वाढविण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नूतन अध्यक्ष व उपाध्यक्षांनी यावेळी दिली. दरम्यान, सर्व संचालकांच्या वतीने पॅनेल प्रमुख राजेंद्र सोनवणे यांनी सुनील धुमाळ, प्रतिभा सोनवणे यांचा सत्कार केला. यावेळी राजेंद्र सोनवणे, फिरोज आत्तार, भालचंद्र ढमे, दादासाहेब जोगदंड, चंद्रकांत सोनवणे, उमेश लालबिगे, संजय चव्हाण, विजय शितोळे, अजय लालबिगे, सुवर्णा भापकर उपस्थित होते.