केंद्राने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी

नवी दिल्ली, 04 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत आहे. यावेळी संसदेच्या सभागृहात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभेत मांडले. अवकाळी पाऊस आणि दुष्काळ यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

पुण्यात जिवंत ग्रेनेड सापडले

महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे. तर काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. या वातावरण बदलामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. त्यामुळे द्राक्षे, कांदा, केळी, गहू, तांदूळ, कापूस, सोयाबीन यांसारख्या विविध पिकांचे तसेच भाजीपाल्याचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या यवतमाळ जिल्ह्यात कापूस आणि सोयाबीन या पिकांची चिंता आहे. तसेच नाशिक, बुलढाणा, जळगाव या जिल्ह्यांत कांद्याच्या पिकांमुळे शेतकऱ्यांची काळजी वाढली आहे.

हवाई दलाचे प्रशिक्षणार्थी विमान कोसळले; 2 वैमानिक ठार

महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच काही भागांत सध्या दुष्काळाची स्थिती आहे. तर दुसरीकडे दुधाला बाजारभाव कमी मिळत आहे. या संकटांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. त्यांना आता आर्थिक आधार देऊन पुन्हा नव्याने उभा करण्याची गरज आहे. त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ करून त्यांचा सातबारा कोरा करण्याची कार्यवाही करावी. तसेच सरकारने वातावरणातील बदलांमुळे झालेल्या नुकसानीचे व्यवस्थापन करण्याबाबत योग्य नियोजन करावे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

One Comment on “केंद्राने महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, सुप्रिया सुळेंची मागणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *