राहुल गांधींनी निवडणुकीतील पराभव स्वीकारला

नवी दिल्ली, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. या निवडणुकीत 3 राज्यांत काँग्रेस पक्षाचा पराभव झाला आहे. त्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज काँग्रेसचा पराभव मान्य केला आहे. त्याचबरोबर त्यांनी पक्षाची विचारधारेची लढाई सुरूच राहील, असे म्हटले आहे. यासंदर्भात राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेयर केली आहे.

विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 राज्यांची सत्ता मिळवली

“आम्ही नम्रपणे मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानचा जनादेश स्वीकारतो. विचारधारेची लढाई सुरूच राहील,” असे राहुल गांधी यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच “मी तेलंगणातील जनतेचा खूप आभारी आहे. प्रजालू तेलंगणा बनवण्याचे वचन आम्ही नक्कीच पूर्ण करू,” असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे. तर राहुल गांधींनी यावेळी सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्या परिश्रम आणि सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.

चीनमध्ये नवा आजार; रोज 7 हजार मुले रुग्णालयात

दरम्यान, तेलंगणा, मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. यामध्ये राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये भाजपने काँग्रेस सरकारचा पराभव करीत सत्ता मिळवली आहे. तसेच मध्य प्रदेशात भाजपने त्यांची सत्ता टिकून ठेवली आहे. तर दुसरीकडे तेलंगणात काँग्रेसला दिलासा मिळाला आहे. तेलंगणामध्ये 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएस पक्षाचा काँग्रेसने पराभव केला आहे.

One Comment on “राहुल गांधींनी निवडणुकीतील पराभव स्वीकारला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *