राजस्थान, 03 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) चार राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे निकाल सध्या जाहीर होत आहे. यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी केली जात आहे. मध्य प्रदेशात 230, राजस्थानमध्ये 199 आणि छत्तीसगडमध्ये 90 आणि तेलंगणात 119 जागांसाठी मतदान झाले होते. या मतमोजणीत भाजपने 3 राज्यांत विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला एका राज्यामध्ये विजय मिळवता आला. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते सध्या आनंद साजरा करीत आहेत.
भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांची सत्ता मिळवली आहे. तर तेलंगणात काँग्रेस पक्ष सत्तेत येणार आहे. त्यामुळे लोकसभेची सेमीफायनल म्हणून पाहत असलेल्या या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांची लाट कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. तर मिझोराम राज्याचा निकाल उद्या लागणार आहे? त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान मध्य प्रदेश येथे विधानसभेच्या 230 जागांसाठी मतदान झाले होते. तर या मतमोजणीत भाजपने सर्वाधिक 166 जागा जिंकल्या आहेत. तर त्यापाठोपाठ काँग्रेसला 64 जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजप स्पष्ट बहुमताने सरकार स्थापन करणार आहे. त्यामुळे मध्यप्रदेशात पुन्हा एकदा कमळ फुलणार आहे. या विजयाचे श्रेय मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना दिले जात आहे.
चीनमध्ये नवा आजार; रोज 7 हजार मुले रुग्णालयात
राजस्थानमध्ये विधानसभेच्या 199 जागांसाठी आज मतमोजणी होत आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसचा पराभव केला. यामध्ये भाजपने सध्या 115 जागांवर विजय मिळवला आहे. तर काँग्रेसला 70 जागा जिंकता आल्या. तर इतर पक्षांना 14 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे आता राजस्थान मधील काँग्रेसची सत्ता गेली असून, यामध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. याचबरोबर भाजपने छत्तीसगड विधानसभा निवडणुकीत देखील विजय मिळवला आहे. छत्तीसगडमध्ये 90 जगांसाठी विधानसभा निवडणुक झाली होती. यामध्ये भाजपने सर्वाधिक 56 जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसला 34 जागा जिंकता आल्या. त्यामुळे छत्तीसगडमध्ये देखील भाजपला स्पष्ट बहुमत प्राप्त झाले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ
तर तेलंगणा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज पार पडली आहे. यावेळी 119 जागांसाठी मतदान झाले होते. या निवडणुकीत काँग्रेसने बीआरएस पक्षाचा पराभव केला आहे. तेलंगणात काँग्रेसने 64 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. तर बीआरएस पक्षाला 39 जागा जिंकता आल्या. त्यामुळे आता तेलंगणात बीआरएस पक्षाच्या हातून 10 वर्षांपासून असलेली सत्ता गेली आहे. दरम्यान तेलंगणामध्ये भाजप आणि एमआयएमला प्रत्येकी 8 जागा जिंकता आल्या आहेत.
One Comment on “विधानसभा निवडणुकीत भाजपने 3 राज्यांची सत्ता मिळवली”