जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांचा सेल्फी व्हायरल

दुबई, 02 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) दुबई येथे सध्या संयुक्त राष्ट्रांची जागतिक हवामान शिखर परिषद (COP28) आयोजित करण्यात येत आहे. या परिषदेत पृथ्वीच्या तापमानातील वाढ मर्यादित ठेवणे आणि हवामान बदलाचे धोकादायक परिणाम रोखणे यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. ही शिखर परिषद 30 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत चालणार आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगभरातील अनेक बडे नेते दुबईला पोहोचले आहेत. या परिषदेला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे नेते देखील उपस्थित होते.

डीपफेक समाजासाठी धोकादायक; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे विधान

यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत एक सेल्फी घेतला. हा सेल्फी जॉर्जिया मेलोनी यांनी सोशल मीडियावर शेयर केला आहे. यासोबतच त्यांनी “चांगले मित्र COP 28 मध्ये” असे या फोटोला कॅप्शन दिले. तसेच जॉर्जिया मेलोनी यांनी यावेळी ‘Melodi’ या हॅशटॅगचा वापर केला. या फोटोत पंतप्रधान मोदी आणि जॉर्जिया मेलोनी हे दोघेही हसताना दिसत आहेत. त्यांच्या या सेल्फीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. त्यांचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

दरम्यान, नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्या या फोटोला लोकांची चांगलीच पसंती मिळताना दिसत आहे. मेलोनी यांनी हा फोटो शेयर केल्यापासून त्यांच्या फोटोवर लाखो लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडला आहे. दोन्ही नेत्यांच्या या फोटोवर अनेकजण मजेशीर कमेंटही करीत आहेत. तर जॉर्जिया मेलोनी यांनी हा फोटो शेयर केल्यानंतर काही वेळातच Melodi हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड करत होता. त्यांच्या या सेल्फीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मित्रांना भेटणे नेहमीच आनंददायक असते. असे त्यांनी म्हटले आहे. तर याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहे. तत्पूर्वी, जॉर्जिया मेलोनी यावर्षी सप्टेंबरमध्ये G20 परिषदेसाठी भारतात आल्या होत्या. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली होती. त्यांच्या या भेटीची सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. त्यावेळी त्यांचे लोकांनी सोशल मीडियावरून बरेच कौतुक केले होते.

One Comment on “जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांचा सेल्फी व्हायरल”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *