नवी दिल्ली, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट संघाची आज निवड करण्यात आली आहे. यासंदर्भात नवी दिल्ली येथे आज निवड समितीची बैठक झाली. दरम्यान भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यात 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. तत्पूर्वी, रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी क्रिकेट बोर्डाला दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेत विश्रांती देण्याची विनंती केली होती.
त्यामुळे रोहित शर्माच्या गैरहजेरीत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेसाठी भारताचे कर्णधारपद केएल राहुल याच्याकडे देण्यात आले आहे. तर टी-20 मालिकेत भारतीय संघाच्या कर्णधारपदी सूर्यकुमार यादवची निवड करण्यात आली आहे. तसेच वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत. त्यामुळे या मालिकेत खेळणे हे त्याच्या फिटनेसवर अवलंबून राहणार आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरूवात टी-20 मालिकेपासून होणार आहे. ही मालिका 10 ते 14 डिसेंबर या कालावधीत होणार आहे. तसेच वनडे मालिका 17 ते 21 डिसेंबर या दरम्यान आणि कसोटी मालिका 26 डिसेंबर ते 7 जानेवारी या कालावधीत होणार आहे.
आयुर्वेदिक सिरप प्यायल्याने 5 जणांचा मृत्यू
टी-20 मालिकेतील भारतीय संघ:- यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, रुतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, ईशान किशन (विकेटकीपर), जितेश शर्मा (विकेटकीपर), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर , रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग , मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.
वनडे मालिकेतील भारतीय संघ:- ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, टिळक वर्मा, रजत पाटीदार, रिंकू सिंग, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार आणि विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , मुकेश कुमार, आवेश खान, अर्शदीप सिंग आणि दीपक चहर.
सत्ताधारी जातीयवाद पसरवत आहेत – विजय वडेट्टीवार
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ:- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) आणि प्रसीध कृष्णा.
One Comment on “दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड”