महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला

मुंबई, 30 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) महापरिनिर्वाण दिनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येतात. या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच अधिकाऱ्यांसोबत मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक घेतली. या बैठकीत महापरिनिर्वाण दिनी देशभरातून येणाऱ्या अनुयायींची गैरसोय टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

भविष्यात सर्व महिला सैनिक देशाला नव्या उंचीवर घेऊन जातील – राष्ट्रपती

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 6 डिसेंबर रोजी 67 वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी मुंबईच्या दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. या अनुयायींना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच यंत्रणांनी काटेकोर नियोजन करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

तसेच महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनाच्या वतीने दादर चैत्यभूमी, छत्रपती शिवाजी महाराज मैदान मुंबईतील बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी निगडीत विविध स्थळांची दर्शन व्यवस्था याठिकाणी सध्या जय्यत तयारी सुरू आहे. या ठिकाणच्या सोयी सुविधांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी ह्या बैठकीतून घेतला आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, खासदार राहुल शेवाळे, मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. आय एस चहल यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी राहुल द्रविड कायम, बीसीसीआयची माहिती

One Comment on “महापरिनिर्वाण दिनाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *