उपाशी पोटी ‘हे’ पदार्थ खाण्याचे टाळा

काही पदार्थ योग्य प्रकारे खाल्ल्याने आरोग्यास ते लाभदायी राहते. त्यामुळे चांगल्या आरोग्यासाठी आहारतज्ज्ञांकडून अनेक पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. मात्र या पदार्थांचे सेवन कोणत्या वेळी करावेत, हे महत्त्वाचे असते. मात्र असे काही पदार्थ आहेत, जे उपाशी पोटी खाल्ल्यानंतर पोट बिघडवू शकतात.

उपाशी पोटी केळी खाणे टाळा
उपाशी पोटी केळी खाल्ल्याने पोट बिघडण्याचा धोका बळकावतो. केळी खाल्ल्याने शरीरात मॅग्नेशियमचे प्रमाण वाढते. यामुळे शरीरात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण कमी- अधिक होते.

उपाशी पोटी दारुचे सेवन टाळा
शक्यतो उपाशी पोटी दारुचे सेवन टाळावे. उपाशी पोटी दारु पिल्याने पोटात जळजळ होते. तसेच पोट बिघडते. यासह याचा परिणाम हा पचन क्रियेवर देखील होतो.

उपाशी पोटी लेमन सोड्याचे सेवन टाळा
उपाशी पोटी लेमन सोड्याचे सेवन केल्याने पोट बिघडते. कारण लेमन सोड्यात जास्त प्रमाणात कार्बोनेट अ‍ॅसिड असते. यामुळे पोटाला त्रास जाणवू लागतो

उपाशी पोटी टोमॅटो खाणे टाळा
टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात अ‍ॅसिड असते. यामुळे उपाशी पोटी टोमॅटो खाल्ल्याने पोटाला त्रास जाणवू लागतो. तसेच पोट बिघडण्याचा धोका बळकावतो.

उपाशी पोटी दही खाणे टाळा
उपाशी पोटी दही खाणे हे खूप त्रासदाय ठरते. दही खाल्ल्याने पोट बिघडते. यामुळे उपाशी पोटी दही खाणे शक्यतो टाळावे.

उपाशी पोटी मसालेदार अन्न खाणे टाळा
उपाशी पोटी मसालेदार अन्न खाल्ल्याने पोटात अस्वस्थता येते. त्यामुळे पोटात अ‍ॅसिडिटी किंवा वेदना होऊ लागतात. मसालेदार अन्नाचा तिखटपणा पोटास खूप त्रासदायक ठरतो. यामुळे शक्यतो उपाशी पोटी मसालेदार अन्न टाळावेत.

उपाशी पोटी चहाचे सेवन टाळा
उपाशी पोटी चहाचे सेवन केल्याने गॅस आणि अ‍ॅसिडिटीचा त्रास जाणवू लागतो. यामुळे उपाशी पोटी चहा पिताना नेहमी त्या सोबत चपाती किंवा बिस्किटे खावीत. यामुळे पोटाचा त्रास होत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *