अवकाळी पावसामुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर शेती पिकांचे नुकसान – मुख्यमंत्री शिंदे

मुंबई, 29 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही दिवसांपासून राज्यात जोरदार अवकाळी पाऊस पडत आहे. या पडत असलेल्या पावसामुळे राज्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर यावेळी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसासह गारपीट देखील झाली. त्यामुळे शेती पिके आणि फळबागांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्याला अटक

राज्यात अवकाळी पाऊस पडलेल्या जिल्ह्यांत आजपर्यंत मिळालेल्या प्राथमिक अंदाजे माहितीनुसार, 99 हजार 381 हेक्टर क्षेत्रातील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे तातडीने करण्यात यावेत. तसेच अवकाळी पावसामुळे 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाल्याप्रकरणी निधीची मागणी करणारा प्रस्ताव राज्य सरकारला तात्काळ पाठविण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.

अटीतटीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा भारतावर 5 गडी राखून विजय

दरम्यान, राज्यातील अनेक जिल्ह्यांत 26 नोव्हेंबर रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये कृषी विभागाकडून प्राप्त झालेल्या प्राथमिक अंदाजे माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील 32 हजार 833 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. तसेच बुलढाणा 33 हजार 951 हेक्टर, अहमदनगर 15 हजार 307 हेक्टर, जालना 5 हजार 279 हेक्टर, छत्रपती संभाजीनगर 4 हजार 200 हेक्टर, पुणे 3 हजार 500 हेक्टर, नंदुरबार 2 हजार 239 हेक्टर, परभणी 1 हजार हेक्टर, जळगाव 522 हेक्टर, बीड 215 हेक्टर, ठाणे 53 हेक्टर, पालघर 41 हेक्टर, धुळे 46 हेक्टर आणि सातारा 15 हेक्टर क्षेत्रातील शेती पिके आणि फळबागांचे नुकसान झाले आहे. तर राज्यात नुकसान झालेल्या शेतजमिनीचे तातडीने पंचनामे करून त्याचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी वेळेत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

One Comment on “अवकाळी पावसामुळे अंदाजे 99 हजार 381 हेक्टर शेती पिकांचे नुकसान – मुख्यमंत्री शिंदे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *