महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते माहिती पत्रक आणि पोस्टरचे अनावरण

मुंबई, 28 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांसाठी माहिती पत्रक आणि पोस्टरचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम राजभवनात महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज पार पडला. याप्रसंगी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, समितीचे मयूर कांबळे, महेंद्र साळवे, सिद्धार्थ कासारे आदी उपस्थित होते.

जय मल्हार क्रांती संघटनेच्या महाराष्ट्र राज्य युवक मुख्य संपर्क प्रमुख पदी रविंद्र जाधवांची निवड

दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिनांक 1 व 7 डिसेंबर या कालावधीत मुंबईत चैत्यभूमीवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येत असतात. या अनुयायांना सर्व गोष्टींची माहिती मिळावी, यासाठी हे माहिती पत्रक आणि पोस्टर आयोजकांच्या वतीने तयार करण्यात आले. याच्या माध्यमातून अनुयायांना राहण्याची सुविधा, प्रवास, वैद्यकीय सुविधा, सुरक्षेची माहिती यांसारख्या अनेक गोष्टींची माहिती मिळणार आहे.

पत्नी आणि मुलाचा खून करून स्वतःचे जीवन संपवले; शिक्षकाचे टोकाचे पाऊल

तत्पूर्वी, या संदर्भातील सर्व महिती राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी आयोजकांकडून घेतली. तसेच चैत्यभूमी येथील सुविधांमध्ये कमतरता राहणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्यपालांनी आयोजकांना दिले आहेत. दरम्यान, हे माहिती पत्रक आणि पोस्टर आता राज्यातील विविध वस्त्यांमधील बुद्ध विहारांमध्ये लावली जाणार आहेत.

One Comment on “महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्यपालांच्या हस्ते माहिती पत्रक आणि पोस्टरचे अनावरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *