अन्न व औषधी प्रशासनांचं बारामतीवर दुर्लक्ष

बारामती, 18 जूनः शहरातील कर्तबगार पोलिसांनी बारामती शहरांमधील अनधिकृत गुटख्यावर जबरी कारवाई केलेल्या लाखो रुपयांचा माल जप्त केला. या बाबतचा अहवाल अन्न व औषधी प्रशासन पुणे आयुक्त यांच्याकडे तपासणीसंबंधी पोलिसांनी पत्रव्यवहार केला आहे. गेल्या पाच-सहा धाडींमध्ये औषधी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दखलच घेतलीच नाही, असे दिसून आले.

अन्न व औषध प्रशासनाचे वाजे बारामतीमध्ये असल्याची चर्चा सुरु आहे. बारामतीसाठी सहाय्यक आयुक्त पदाचा अधिकारी अशी प्रकरणे हाताळण्यासाठी नियुक्त केला आहे. सदर अधिकारी पोलिसांना भीक घालत नसल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे बारामतीमध्ये लहान मोठ्या टपऱ्यांवर गुटका विक्रीचे साम्राज्य निर्माण झाल्याचे चित्र आहे. मात्र हे रोखण्याचे अन्न व औषध प्रशासन कमी पडताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *