बानप हद्दीत नियमबाह्य बांधकामास अभय!

कोणाच्या आशीर्वादाने चालतात नियमबाह्य बांधकाम?

बारामती, 27 नोव्हेंबरः बारामती शहराचा सुनियोजित विकास व्हा, ही बारामतीकरांची प्रामणिक इच्छा आहे. परंतु बारामती नगर परिषदेच्या प्रशासन व शासन यांच्या आशीर्वादने बारामतीमध्ये बेकायदेशीर व नियमबाह्य पेव फुटल्याचे निदर्शनात येत आहे. अनेक बांधकामांविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल असताना व नगरपरिषदेच्या विरोधात निकाल असताना तसेच अनेक अवमान याचिका दाखल असताना बारामती नगर परिषद उच्च न्यायालयाच्या आदेशांना कचऱ्याची टोपली दाखवत आहे. नियमबाह्य काम करून अर्थाजन करणाऱ्या बानपच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या काम करण्याची पद्धत अंगवळणी पडली आहे.

शुभमन गिल गुजरात टायटन्सचा कर्णधार बनला

श्रीकांत भिले यांनी मौजे जळोची येथील गट नंबर 161/1 प्लॉट नंबर 7 व 8 येथे 8 जून 2021 रोजी बांधकाम प्रारंभ दाखल घेतला. परंतु भिले यांनी सदर बांधकाम करताना नगरपरिषदेने दिलेल्या परवानगीमधील अटी शर्तींचा भंग केला. या बाबत बांधकामच्या शेजारी राहणाऱ्या सोहेल गुलमोहोम्मद शेख यांनी बानपमध्ये लेखी व तोंडी निवेदन देऊन देखील नगरपरिषदेने कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. दरम्यान, बांधकामच्या वेळी भिले यांनी अशोकाच्या झाडांची अवैधरित्या वृक्षतोड केली. मात्र बानपने सदर कृत्याकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केले. तदनंतर श्रीकांत भिले यांनी बांधकाम परवाना दुरुस्तीसाठी बानपकडे अर्ज करून त्याच नियमबाह्य बांधकामावर फेरपरवानगी घेतली आणि त्यामध्ये सर्व अटी शर्ती पायदळी तुडवत तेच बांधकाम प्रत्यक्षात चालूच आहे.

दीपक केसरकरांनी त्या मुलीची जाहीर माफी मागावी- सुप्रिया सुळे

बारामती नगरपरिषदेला कुठल्याही कायद्याची भिती राहिली नाही. न्यायालयीन प्रक्रियेची भिती राहिली नाही. भिले सारखे लोक बारामतीमध्ये बोकाळली असून बारामती शहराचे विद्रोपीकरण सर्रासपणे चालू आहे. भविष्यात होणाऱ्या दुर्घटनेस जबाबदार कोण? हा प्रश्न बारामतीकर बारामतीचे सर्वेसर्वा अजित पवार यांना विचारत आहे.

One Comment on “बानप हद्दीत नियमबाह्य बांधकामास अभय!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *