बारामती/मोढवे, 25 नोव्हेंबरः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यातील मोढवे या गावातील मरीआई मंदिरामध्ये चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अज्ञात चोरांनी सोमवारी (20 नोव्हेंबर) रात्री तब्बल वीस ते बावीस किलो किलो चांदीचा ऐवज चोरी झाल्याचे सांगण्यात आले. सदर प्रकरणाचा तपास हा वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सचिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.
अज्ञात वाहनेच्या धडकेत हरणाचा मृत्यु
बारामती तालुक्यातील मोढवे या गावात मरीआईचे जागृत देवस्थान अशी ओळख असलेल प्रसिद्ध मंदिर आहे. सदर ठिकाणी सोमवारी रात्री एक ते दीड च्या सुमारास अज्ञात चोरांनी मुख्य गाभाऱ्यात प्रवेश करून चांदीचे मखर चोरी केल्याचे समोर आले आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्यातील अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. सदर चोरीमुळे बारामतीच्या पश्चिम पट्ट्यातील स्थानिकांच्या मनामध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
परिवर्तन व्याख्यानमालेतून गावचा विकासाचे गिरवले धडे
मंगळवारी संपूर्ण दिवसभर विविध पोलीस पथकांमार्फत या घटनेचा तपास सुरू होता. या घटनेबाबत मात्र पोलीस प्रशासनाने भूमिका व माहिती देण्याबाबत गुप्तता पाळण्यात आली आहे.
One Comment on “मरीआई देवीच्या मंदिरात चोरी”