बारामतीत अनुसूचित जातीच्या निधीचा गैर वापर; ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल करा- सुजय रंधवे

बारामती, 15 जूनः बारामतीमधील इंदापूर रोडला जोडून हरिकृपा नगर येथे उच्चभ्रू विभागात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. हरिकृपा नगर या उच्चभ्रू वस्तीमध्ये एक ही अनुसूचित जातीचे कुटुंब (महार, मांग, चांभार, ढोर, मेहत्तर, होलर, खाटिक) राहत नसून रस्त्याचे डांबरीकरण केले आहे, असे सुजय रंधवे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, बारामती शहरातील अण्णाभाऊ साठे नगरमध्ये शौचालयाला दरवाजे बसवायला बारामती नगर परिषदेकडे पैसे नाहीत. परंतु उच्चभ्रू वस्तीमध्ये दी चॅलेंजर्स फुटबॉल तुर्फ या व्यवसायिक खेळाच्या मैदानासाठी हा रस्ता बनवला आहे. कुठलीही सार्वजनिक हितसंबंध नाही, कुठलीही अनुसूचित जातीची वस्ती (महार, मांग, चांभार, खाटिक, होलर, मांग-गारुडी, मेहत्तर) नसताना बारामती नगर परिषदेने सदरचा रस्ता बनवला आहे. या बाबत तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी खोटी कागदपत्रे तयार करून आर्थिक हितसंबंधी पायी सर्व साधरण सभेची दिशाभूल करून अनुसूचित जातीच्या पैशांचा अपहार केल्याचा आरोप करत सुजय रंधवे यांनी केला आहे. तसेच समाज कल्याण आयुक्तांना याबाबत तक्रार दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *