शरद पवार गटातील ‘यांची’ खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी

नवी दिल्ली, 23 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) गेल्या काही महिन्यांपूर्वी अजित पवार यांनी शरद पवार यांना सोडून जात शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार यांच्यात सध्या राष्ट्रवादी पक्षावरून संघर्ष होताना पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन्ही गटांकडून पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला जात आहे. याप्रकरणी सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. अशातच अजित पवार गटातील प्रमुख नेते प्रफुल्ल पटेल यांचे राज्यसभा सदस्यत्व करण्यात यावे, अशी मागणी शरद पवार गटाने केली आहे. यासंबंधी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने उपराष्ट्रपतींची भेट घेतली. यासंदर्भातील पत्र त्यांनी उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जयदीप धनकर यांना दिले आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आजपासून टी-20 मालिका

त्यानंतर अजित पवार गट देखील आक्रमक झाला आहे. अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडे शरद पवार गटातील सदस्यांना अपात्र ठरवण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात अजित पवार गटाने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभेच्या सभापतींकडे तक्रार केली आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांची नावे वगळून वंदना चव्हाण, फौजिया खान, श्रीनिवास पाटील, फैजल मोहम्मद यांची खासदारकी रद्द करण्यात यावी, अशी मागणी अजित पवार गटाने केली आहे.

एसटीच्या नवीन बसेस घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मंजुरी

त्यामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची खासदारकी रद्द झाली तर त्यांना सहानुभूती मिळू शकते, या पार्श्वभूमीवर त्यांची ह्या यादीतून नावे वगळण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे यासंदर्भात राज्यसभेचे सभापती काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह यासाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट यांच्यात सध्या निवडणुक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे यासंदर्भात निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार? हे पाहणे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.

One Comment on “शरद पवार गटातील ‘यांची’ खासदारकी रद्द करा, अजित पवार गटाची मागणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *