नरेंद्र मोदींना जीवे मरण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई, 22 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एका व्यक्तीने फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी एका तरूणाला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या विरोधात आता गुन्हा नोंदविण्यात आला आहे. कामरान अमीर खान असे या 29 वर्षीय तरूणाचे नाव असून तो मुंबई मधील सायन पूर्व परिसरातील रहिवासी आहे. तर हा कॉल बनावट असल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे.

आम्ही खोटे ठरलो तर फाशीची शिक्षा भोगायला तयार- रामदेव बाबा

या आरोपीने काल (दि. 21 नोव्हेंबर) मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला होता. त्यावेळी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने आपल्याला नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना जीवे मरण्याचे काम दिले असल्याचे या तरूणाने फोनवरून म्हटले होते. तसेच त्याने मुंबईतील जेजे रुग्णालय उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी या आरोपीचा फोन ट्रेस करून त्याला तात्काळ अटक केली. तर हा बनावट कॉल केल्याप्रकरणी त्याच्या विरोधात आता कलम 505 (2) अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.

असे फोटो व्हायरल करून प्रतिमा मलीन करता येत नाही – बावनकुळे

दरम्यान हा बनावट फोन करणारा तरूण मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरूण जेजे रुग्णालयात आला होता. मात्र त्यावेळी रुग्णालयात गर्दी होती. त्यामुळे त्याला डॉक्टरांना भेटता आले नाही. त्यानंतर त्याने या रुग्णालयातून पोलिसांना फोन करीत ही धमकी दिली होती. तसेच त्याला यापूर्वी देखील असा कॉल केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेली आहे. तर याप्रकरणाचा अधिक तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.

 

2 Comments on “नरेंद्र मोदींना जीवे मरण्याची धमकी देणाऱ्याला अटक”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *