दहावी-बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ

पुणे, 22 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे. बारावीच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 20 नोव्हेंबर रोजी समाप्त झाली होती. त्यामुळे या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थांना आता 28 नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत.

गौतम गंभीर पुन्हा शाहरूख खानच्या आयपीएल संघात!

त्याचबरोबर दहावीच्या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच त्यानंतर विद्यार्थ्यांना 8 डिसेंबरपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार आहे. विद्यार्थ्यांना हे अर्ज शिक्षण मंडळाच्या www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावरून भरता येतील. त्यामुळे या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे.

नितेश राणे यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट

दरम्यान, बारावीची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 ते 19 मार्च 2024 या कालावधीत पार पडणार आहे. तसेच बारावीच्या माहिती तंत्रज्ञान आणि सामान्य ज्ञान या विषयाची परीक्षा ऑनलाईन होणार असून, ती 20 ते 23 मार्च 2024 या कालावधीत होणार आहे. त्याचप्रमाणे इयत्ता बारावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घेतली जाणार आहे. तर इयत्ता दहावीची लेखी परीक्षा 1 ते 26 मार्च 2024 या कालवधीत होणार आहे. तसेच दहावीची श्रेणी, प्रात्यक्षिक, तोंडी आणि अंतर्गत परीक्षा 10 ते 19 फेब्रुवारी यादरम्यान होईल. या परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण मंडळाने याआधीच जाहीर केलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षांची तयारी करण्याची आवश्यकता आहे.

2 Comments on “दहावी-बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *