हे करा, अन्यथा तुमचा UPI आयडी होऊ शकतो बंद!

दिल्ली, 20 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) तुम्ही जर UPI द्वारे ऑनलाईन व्यवहार करत असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने नुकतेच एक परिपत्रक जाहीर केले आहे. एखाद्या व्यक्तीने त्यांच्या UPI आयडी वरून गेल्या एका वर्षापासून ऑनलाईन व्यवहार केला नसेल तर, त्यांचा तो UPI आयडी 1 जानेवारी 2024 पासून बंद करण्यात येईल, असे नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने या परिपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा UPI आयडी बंद करायचा नसेल तर, त्यावरून ऑनलाईन व्यवहार करणे आवश्यक आहे.

बावनकुळेंच्या कॅसिनोतील फोटोमुळे आरोप प्रत्यारोप

यासंबंधीच्या सूचना नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने देशातील सर्व बँकांना दिल्या आहेत. ऑनलाईन व्यवहार न करणाऱ्या ग्राहकांचा बँकांनी शोध घ्यावा, असे NPCI ने म्हटले आहे. 31 डिसेंबर 2023 पर्यंत सक्रिय न झालेला UPI आयडी 1 जानेवारी 2024 पासून निष्क्रिय केला जाईल. त्या UPI आयडी वरून कोणतेही व्यवहार करू शकणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे काही कारणास्तव तुम्ही जर गेल्या एक वर्षापासून UPI आयडीद्वारे कसलेही आर्थिक व्यवहार केले नसल्यास तुम्ही लगेच तुमच्या UPI आयडी वरून आर्थिक व्यवहार करा.

राष्ट्रवादी कोणाची? आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी

त्यानूसार देशातील सर्व बँका आणि गुगल पे, पेटीएम, फोनपे आणि ॲमेझॉन पे यांसारखे सर्व थर्ड पार्टी ॲप आता अशा ग्राहकांच्या UPI आयडी आणि मोबाईल नंबरची पडताळणी करतील. यामध्ये एका वर्षापासून UPI व्यवहार झाला नसेल, तर तो 31 डिसेंबर 2023 नंतर बंद करण्यात येईल. त्यामुळे UPI वरील व्यवहार आता पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होतील आणि फसवणुकीच्या घटनांना आळा बसेल. अनेक लोक आपला नंबर बदलतात. तसेच UPI आयडी त्यांच्या लक्षात राहत नाही. ते UPI आयडी डिॲक्टिवेट करायला विसरून जातात. त्यामुळे फसवणुकीचे व्यवहार वाढू शकतात. या पार्श्वभूमीवर, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे.

One Comment on “हे करा, अन्यथा तुमचा UPI आयडी होऊ शकतो बंद!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *