मुंबई, 16 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्रात गेल्या ऑक्टोंबर महिन्यापासून झिका व्हायरसचे 5 रुग्ण आढळले असल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये इंचलकरंजी झिका व्हायरसचे सर्वाधिक 2 रुग्ण आढळले आहेत. तर पुणे, कोल्हापूर आणि पंढरपूर येथे झिका व्हायरसचा प्रत्येकी 1 रुग्ण सापडला आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. यासंदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.
धनगर समाजाच्या वतीने आज बारामती बंदची हाक
झिका विषाणूचा संसर्ग सर्वप्रथम पश्चिम, मध्य आफ्रिका आणि आग्नेय आशियामध्ये सुरू झाला. झिका विषाणू एडिस डास चावल्यामुळे पसरतो. यासोबतच हे डास डेंग्यू, चिकुनगुनिया आणि पिवळा ताप यासाठीही कारणीभूत ठरत आहेत. तसेच गर्भवती महिलेला झिका विषाणूची लागण झाली, तर गर्भातील बाळाला देखील संसर्ग होण्याची भीती असते.
झिका विषाणू ची लागण झाली असेल तर, त्या रुग्णाच्या शरीरावर लाल ठिपके येतात. याशिवाय रुग्णाला खूप ताप येतो. डोळे लाल होतात. तसेच स्नायू आणि सांधे दुखणे आणि डोकेदुखी होते. दरम्यान, झिका विषाणूची लक्षणे सामान्य असतात. त्यामुळे काही लोकांना झिका विषाणूची लागण झाल्याचे लक्षात येत नाही. तसेच झिका व्हायरस मुळे मृत्यूचे प्रमाण सर्वात कमी आहे. त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही. तर झिका विषाणूपासून संरक्षण करण्यासाठी अद्याप कोणतीही लस विकसित झालेली नाही.
टीम इंडियाची अंतिम फेरीत धडक
तत्पूर्वी आरोग्य विभागाच्या वतीने झिका व्हायरस संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. नागरिकांना साधा ताप जरी आल्यास तात्काळ सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. सरकारी रुग्णालयात झिका व्हायरस वरील उपचार पूर्णपणे मोफत आहेत.
One Comment on “राज्यात झिका व्हायरसचे 5 रुग्ण”