शिवसेनेच्या शाखेचा वाद आता कोर्टात रंगणार

मुंब्रा, 12 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा गेल्या आठवड्यात पाडण्यात आली. अतिक्रमण केल्याच्या कारणावरून शिवसेनेच्या या शाखेवर बुलडोझर फिरवण्यात आला होता. यासंदर्भात ठाकरे गट आता कोर्टात धाव घेणार असल्याचे म्हटले जात आहेत. त्यामुळे मुंब्र्यातील वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर या शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे हे काल सायंकाळी मुंब्रा येथे आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे गटाच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच याठिकाणी शिंदे गटाचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने जमा झाले होते. यावेळी शिवसेनेचे दोन्ही गट आमने सामने झाल्याचे पाहायला मिळाले.

पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर; उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट

त्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर त्याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यादरम्यान पोलिसांनी उद्धव ठाकरे यांची गाडी शाखेपासून काही मीटर अंतरावर रोखली. त्यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत उद्धव ठाकरेंची समजूत काढली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखेची लांबूनच पाहणी करावी लागली. यावेळी ठाकरे गटाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते.

भाजप पदाधिकाऱ्याची हत्या; आरोपी फरार

आता याप्रकरणात एक नवी बातमी समोर आली आहे. मुंब्रा येथील शिवसेनेच्या शाखा संदर्भात उद्धव ठाकरे हे कोर्टात जाणार आहेत. याबाबत ते मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करणार आहेत. मुंब्रा येथील शाखा ही आपलीच असल्याचा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे. तर यासंदर्भात ठाकरे गटाकडून सध्या कायदेशीर बाबी विचारात घेतल्या जात आहेत. त्यामुळे याप्रकरणाचा वाद आता कोर्टात रंगणार आहे.

2 Comments on “शिवसेनेच्या शाखेचा वाद आता कोर्टात रंगणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *