पुणे, 11 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राज्यात सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पाहायला मिळतोय. तर दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी जाण्यासाठी पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात सध्या प्रवाशांची मोठी गर्दी झालेली दिसत आहे. स्वारगेट बस स्थानकात आज सकाळपासूनच प्रवाशांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान दिवाळीसाठी अनेकजण आपल्या गावी जात असतात. दिवाळीच्या कालावधीत सार्वजनिक वाहतूकीसह खाजगी वाहतुकीला देखील मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यावेळी अनेक खाजगी वाहन चालकांकडून प्रवाशांची मोठ्या प्रमाणात लूट केली जाते. या पार्श्वभूमीवर, एसटी महामंडळाने यंदाच्या दिवाळीत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
महापरिनिर्वाण दिनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी – वर्षा गायकवाड
यामध्ये एसटी महामंडळाच्या पुणे विभागातून 500 पेक्षा अधिक बसेस सोडण्यात येणार आहेत. दिवाळी सणाच्या निमित्ताने दरवर्षी एसटीच्या गाड्यांना गर्दी झालेली पाहायला मिळते. यामध्ये पुण्यात अनेक लोक नोकरीसाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी राहत असतात. दिवाळीनिमित्त महाविद्यालये व शाळांना सुट्टी असते. तसेच अनेक नोकरदारांना देखील दिवाळी सणाची सुट्टी असते. ते लोक दिवाळीच्या सुट्टीत आपल्या गावी जातात. त्यातील बहुतांश लोक हे एसटी बस नेच प्रवास करणे पसंत करतात. परिणामी एसटी बसमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने दिवाळीच्या काळात पुणे विभागातून जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. या गाड्या पुण्याहून मराठवाडा, नागपूर, कोल्हापूरला जाण्यासाठी सोडण्यात येणार आहेत.
सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी ठरला!
दरम्यान, राज्य सरकारच्या माध्यमातून एसटी बसमध्ये प्रवाशांना तिकीट दरात अनेक सवलती दिल्या जात आहेत. यामध्ये एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांना सध्या तिकीट दरात 50 टक्के सवलत, तर 75 वर्षे पूर्ण झालेल्या ज्येष्ठांना एसटीच्या बसमधून मोफत प्रवासाची सवलत देण्यात येत आहे. याशिवाय 65 ते 75 वर्षाच्या ज्येष्ठांना देखील एसटी बसमधून तिकीट दरात 50 टक्के सवलत दिली जात आहे. त्यामुळे अनेक लोक खाजगी वाहनाने न जाता एसटी बसनेच प्रवास करताना दिसत आहेत.
2 Comments on “दिवाळीनिमित्त एसटीच्या जादा बसेस”