बारामती, 6 जूनः बारामतीमधील शारदा नगर येथे राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे विज्ञान प्रदर्शन 15 ते 17 जून दरम्यान राजीव गांधी सायन्स टेक्नॉलॉजी कमिशन महाराष्ट्र शासन यांचे सायन्स सेंटर बारामती, अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे.
या प्रदर्शनात मागील 3 वर्षांपासून राज्य राष्ट्रीय स्तरावरील इनस्पायर आवर्डसाठी निवड झालेले प्रकल्प, या वर्षी जिल्हा स्तरावर निवड झालेले प्रकल्प, कोठेही निवड न झालेले, मात्र नवीन क्रिएटिव्ह मॉडेल तयार आहेत, अशा राज्यातील कोणत्याही शाळेतील सर्व प्रकारच्या माध्यमाच्या शाळांमध्ये इयत्ता 5 वी ते 12 वी चे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात.
या प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांना निवासासह भोजनची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना सहभाग प्रमाणपत्रसह स्मृती चिन्ह तसेच एक वर्षासाठी सायन्स सेंटर बारामती येथील सदस्य कार्ड मोफत दिले जाणार आहे. तसेच एका वर्षाकरीता ऑनलाईन कार्यशाळा शास्त्रज्ञांसोबत संवाद यामध्ये सहभागी होता येईल.
या प्रदर्शनात इयत्ता 5, इयत्ता 5 वी ते 8 वी आणि इयत्ता 9 वी ते 12 वी असे तीन गट करण्यात आले. प्रत्येक गटातून प्रथम तीन प्रकल्पास अनुक्रमे 10000, 7500, 5000 रुपये रोख पारितोषिक, प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देण्यात येणार आहे. तसेच Incubation मार्फत पॅटेंटसाठी सल्ला आणि मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे सीओ निलेश नलवडे यांनी दिली. अधिक माहितीसाठी https://forms.gle/tkksD4dTpF6FyxZQ7
या लिंकवर क्लिक करा.