बारामती ग्रामपंचायतीच्या निवडणुका खुप उत्साहात पार पडल्या. विरोधकांचा चिंचु प्रवेश तर सत्ताधाऱ्यांच्या ‘कही खुशी कही गम’ अशी अवस्था. ह्या इलेक्शनमध्ये लक्ष्मी दर्शन पदोपदी झाले. रडीचा खेळही झाला. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भावकीचा वाद उफळून येणार नाही, तर ती निवडणूक कसली. किरकोळ बाचाबाची, वादविवाद हे प्रशासनाला नेत्याची बाब. राष्ट्रवादीच्या दोन गटात शित युद्ध असल्याचे या निवडणुकीत स्पष्ट झाले. सायंबाचीवाडीत बाचाबाचीचे परिमार्जन मारामरीत झाले. ‘सिंह आला पण गड गेला’, अशी स्थिती एका गटाची झाली. मरामारीतून दगडफेक, राडारोडा, तलवार बाजी, एका गड्याने तर बंदुकच काढली. चार पोलीस बिचारी काय करणार?
जमावाने गाड्या फोडल्या, चकनाचुर, चारी दिशेला पळापळ, पोलिसांनी नंतर फिर्याद दाखल केली. मंगळसुत्र खेचण्यावरून झालेली सुरुवात बंदुकीपर्यंत आली. काही लोक म्हणतात, पुण्याची पोरं होती, कोणी कोणाला मारलं? का मारलं? हे कोणालाच माहिती नाही? पण रक्तारोड झाली, हे मात्र खरं आहे. मात्र फिर्यादीत ना मंगळसुत्राची खेचाखेची, ना बंदुकीची वाचता, सगळं कसं अलबेल. जिल्हाधिकाऱ्यांने तर जमावबंदीचा आदेश असतानाही ‘ना शस्त्र बंद, ना जमाव बंद’ ह्याला म्हणत्यात इलेक्शन! शंभर जण आत, कित्येक मोबाईल बंद, पोलिसांवर राजकीय दबाव, आर्थिक व्यवहार, झालं बरं का इलेक्शन!