राष्ट्रवादी कोणाची? याबाबत आज सुनावणी

मुंबई, 9 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) राष्ट्रवादी पक्ष कोणाचा? यासंदर्भात आज निवडणूक आयोगासमोर सुनावणी होणार आहे. तर यावर्षीच्या जुलै महिन्यात अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी शरद पवार यांना सोडून जात शिंदे सरकारला पाठिंबा दिला होता. त्यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना देखील शिंदे सरकारमध्ये मंत्रिपदे मिळाली. तेंव्हा राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी राष्ट्रवादीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता.

पंतप्रधान मोदींनी घेतला नितीश कुमार यांचा समाचार

त्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादीचे अध्यक्ष म्हणून अजित पवार यांची निवड केली. यासोबतच त्यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला. त्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्ष आपलाच असल्याचे सांगत, निवडणूक आयोगात धाव घेतली होती. त्यावेळी अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर शरद पवार गटाने देखील याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर दोन्ही बाजूंकडून प्रतिज्ञापत्र आणि इतर कागदपत्रे जमा करण्यात आली. यावेळी अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला होता. तर शरद पवार यांच्या गटाने अजित पवार गटाने केलेले सर्व दावे फेटाळले आहेत.

शुभमन गिल नंबर वन फलंदाज; बाबर आझमला टाकले मागे!

याबाबत 6 ऑक्टोंबर रोजी पहिली सुनावणी झाली होती. त्यानंतर आता याप्रकरणी दुसरी सुनावणी होणार आहे. शरद पवार गटाकडून अभिषेक मनू सिंघवी हे निवडणूक आयोगासमोर बाजू मांडत आहेत. तर अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मनिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. त्यामुळे आजच्या सुनावणीत निवडणूक आयोग कोणाच्या बाजूने निकाल देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

One Comment on “राष्ट्रवादी कोणाची? याबाबत आज सुनावणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *