प्रबुद्ध युवक संघटनेच्या आंदोलनाला यश; पाहणी समिती गठन!
बारामती, 9 नोव्हेंबरः बारामती तालुक्यात फटका दुकानांचे सुळसुळाट झाले आहे. फटके विक्रेते सर्व नियम ढाब्यावर बसून सरसकाट बेकायदेशीर फटाका स्टॉल टाकून फटाकांची सर्रास विक्री करत आहेत. केंद्र व राज्य शासन यांचे मार्गदर्शक सूचना, तसेच उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालनाने दिलेले आदेश पायदळी तुडवित आहेत. प्रांताधिकारी, बारामती यांनी 100 किलो साठ्याची परवानगी दिली असताना 1000 किलोची साठवणूक केली जात आहे. 10*10 च्या बंदिस्त दुकान अतिरिक्त दुकान थाटणे नगरपरिषदेने दिलेल्या पारवानगीचा गैरवापर करत आहेत. तसेच गावोगावी खेडोपाडी आग्नीशामक परवाने नसतानाही व आग्नीशामक विरोधक यंत्रणा नसतानाही दुकाने सर्रासपणे थाटली जात आहे. गोडावूनला परवानगी नसतानाही लोकवस्तीत गोडावून केली जात आहेत. या विरुद्ध प्रबुद्ध युवक संघटनेने प्रांत कार्यालय, बारामती येथे उपोषण चालून केले असून याची दखल प्रशासनाने तात्काळ घेऊन तहसिलदार, बारामती यांचे मार्गदर्शनाखाली प्रशासन पाहणी समितीचे गठन केले आहे.
यंदाच्या दिवाळीत लोकांना भेटता येणार नाही – अजित पवार
सदर समिती स्फोटक अधिनियमानुसार फटाकांची दुकाने थाटली आहेत का? साठा व वस्तू, साठा वस्तू, स्थिती तपासणी करणार आहेत. केंद्र व राज्य शासनाने दिलेल्या आदेशानुसार आवाजाच्या मर्यादा निश्चित केले असताना त्या मर्यादेबाहेर फटकांचा आवाज आहे का? त्या संबंधीची पाहणी समिती करणार आहे. तर वायू, ध्वनी प्रदुषणाबाबतही समिती लक्ष ठेवणार आहे. असे फटाके विक्रीस मज्जाव करण्याचे आदेश मा. तहसिलदार, बारामती यांनी दिल्याची माहिती प्रबुद्ध युवक संघटनेचे अध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी दिली आहे.
राष्ट्रवादी कोणाची? याबाबत आज सुनावणी
फटाका विक्री, साठवणूक व हताळणीसाठी लागणाऱ्या परवानगी करीता चारित्र्य दाखला देताना काही घोळ झाला का, हे तपासण्याचे आदेश पोलीस उपविभागीय अधिकारी, बारामती यांनी दिले असून साठ्यावर नियंत्रण करणे व महसूल कारवाईला मदत करण्याचे आश्वासन डीवायएसपी बारामती यांनी दिले आहे.
One Comment on “बेकायदा फटका विक्री, साठवणूक व हताळणे विरुद्ध कारवाई कोण करणार?”