सुनील तटकरेंचे निलंबन करा- सुप्रिया सुळे

दिल्ली, 03 नोव्हेंबर: (विश्वजीत खाटमोडे) शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांचे तात्काळ निलंबन करावे, अशी मागणी केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे त्यांना निलंबित केले जावे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. या संदर्भातील पत्र त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

ऐतिहासिक विजयासह टीम इंडियाने केले हे रेकॉर्ड!

या पत्रात सुप्रिया सुळे यांनी ओम बिर्ला यांना लिहिले की, “मी 4 जुलै 2023 रोजी भारतीय राज्यघटनेच्या 10 व्या अनुसूची अंतर्गत सुनील तटकरे यांना अपात्र ठरवण्यासाठी अपात्रता याचिका दाखल केली होती. 4 महिने उलटून गेले तरी यासंदर्भात कारवाई झालेली नाही. सुनील तटकरे यांचे हे पक्ष विरोधी कृत्य दहाव्या अनुसूचीवरील निंदनीय हल्ला आहे. त्यामुळे माननीय सर्वोच्च न्यायालयाने घटना आणि लोकशाही तत्त्वे खर्‍या भावनेने टिकवून ठेवण्यासाठी अशा याचिकांचे वेळीच निराकरण करण्याचे निर्देश दिले आहेत. कृपया याचिकेचा निकाल लावण्यास आणखी विलंब करू नये अशी माझी विनंती आहे.” त्यांच्या या पत्रामुळे सुनील तटकरे यांच्यावर कारवाई होणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आंदोलन मागे घेतल्यानंतर एसटी बस सुरू

दरम्यान, अजित पवार हे जुलै महिन्यात शिंदे सरकारमध्ये सहभागी झाले होते. यावेळी राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फुट पडली होती. त्यावेळी राष्ट्रवादीचे अनेक नेत्यांनी अजित पवारांना पाठिंबा देत, त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. यासोबतच राष्ट्रवादीचे अनेक खासदार-आमदार देखील अजित पवारांसोबत गेले. दरम्यान, अजित पवार हे शिंदे सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याशिवाय त्यांच्यासोबत गेलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांना मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळाली होती.

One Comment on “सुनील तटकरेंचे निलंबन करा- सुप्रिया सुळे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *