मुंबई, 1 नोव्हेंबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षणाची मागणी सध्या राज्यात जोर धरू लागली आहे. त्यासाठी राज्यातील मराठा समाजाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जात आहेत. अशातच राज्यातील सर्वपक्षीय मराठा आमदारांनी आज (दि.01) मंत्रालयाच्या बाहेर आंदोलन केले आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे मराठा आरक्षण लागू करण्यासाठी विशेष अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. तसेच त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याची देखील मागणी केली आहे.
शिंदे गटाच्या आमदाराचे पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान, या सर्वपक्षीय मराठा आमदारांनी आज मंत्रालय परिसरात घोषणाबाजी केली. तसेच त्यांनी मंत्रालयाला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी या आंदोलक आमदारांना ताब्यात घेतले. यादरम्यान पोलिस आणि हे आमदार यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या आंदोलनात अमोल मिटकरी, राजू नवघरे, विक्रम काळे, चेतन तुपे, निलेश लंके, राहुल पाटील, कैलास पाटील, यशवंत माने, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, बाळासाहेब पाटील, मोहन उबर्डे, बाबासाहेब आजबे हे आमदार सहभागी झाले होते.
हसन मुश्रीफ यांच्या गाडीची तोडफोड
तत्पूर्वी, मराठा आरक्षण संदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची आज सह्याद्री अतिथीगृहात बैठक घेण्यात येत आहे. या बैठकीत मराठा आरक्षण संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काही तोडगा निघतो का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे राज्यातील मराठा समाज हा आरक्षण मिळावे यासाठी आंदोलने करीत आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्यासंदर्भात निर्णय घेतला नाही, तर आजपासून पुन्हा पाणी पिणार नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सरकारने मराठा आरक्षणावर तोडगा काढावा, अशी अपेक्षा मराठा समाज करीत आहे.
One Comment on “मंत्रालयाच्या दारात सर्वपक्षीय आमदारांचे आंदोलन”