सहा विजयांसह रोहित शर्माने केले ‘हे’ रेकॉर्ड!

लखनौ, 31 ऑक्टोबर (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक क्रिकेट काल लखनौच्या मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने इंग्लंडचा 100 धावांनी पराभव केला होता. सहा सामन्यांमध्ये भारताचा हा सलग सहावा विजय आहे. त्यामुळे गुणतालिकेत भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली, त्याने 101 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 87 धावा केल्या. या कामगिरी बद्दल रोहितला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे- जरांगे पाटील

त्याचबरोबर, रोहित शर्मा विश्वचषकात सर्वाधिक वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने आपल्या विश्वचषकातील 23 व्या सामन्यात 7 वेळा हा पुरस्कार पटकवला आहे. त्यावेळी रोहितने ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडला आहे. मॅकग्राने विश्वचषकातील 39 सामन्यांत 6 वेळा सामनावीराचा पुरस्कार पटकावला होता. दरम्यान, या यादीत पहिल्या स्थानी भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर असून, सचिन विश्वचषकातील 45 सामन्यांत 9 वेळा सामनावीर ठरला होता.

मराठा आरक्षणः आमदाराच्या घरावर दगडफेक, गाड्या जाळल्या (व्हिडिओ)

तर रोहित शर्माच्या 87 धावांच्या या खेळीनंतर त्याच्या नावावर आणखी काही विक्रम जमा झाले आहेत. दरम्यान, रोहित शर्माचा कर्णधार म्हणून हा 100 सामना होता. 100 आणि त्याहून अधिक सामन्यांत कॅप्टनसी करणारा रोहित शर्मा हा भारताचा सातवा कर्णधार ठरला आहे. या 100 सामन्यांत कर्णधार असलेल्या रोहित शर्माची विजयाची टक्केवारी 74 टक्के इतकी आहे. ही टक्केवारी आजवरच्या सगळ्या भारतीय कर्णधारांमध्ये सर्वाधिक आहे. त्याचबरोबर एकदिवसीय विश्वचषकात पहिले 6 सामने जिंकणारा रोहित हा पहिला भारतीय कर्णधार आहे. तसेच या सामन्यात रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा पूर्ण केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 18000 धावा पूर्ण करणारा रोहित हा भारताचा पाचवा खेळाडू ठरला आहे. याशिवाय कर्णधार म्हणून एका कॅलेंडर वर्षात 1000 पेक्षा अधिक धावा करणारा रोहित हा भारताचा सहावा कर्णधार ठरला आहे. यापूर्वी, मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांनी ही कामगिरी केली होती.

One Comment on “सहा विजयांसह रोहित शर्माने केले ‘हे’ रेकॉर्ड!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *