‘मी पुन्हा येईन’ च्या व्हिडिओवर फडणवीसांचे स्पष्टीकरण

नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

मुंबई, 28 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) भारतीय जनता पार्टीने काल (दि.27) देवेंद्र फडणवीस यांचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. 4 वर्षे जुन्या या व्हिडिओमध्ये “नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी मी पुन्हा येईन” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणताना दिसत होते. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले. मात्र, काही वेळातच त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरून डिलीट करण्यात आला.

याविषयी देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिले आहे. एखाद्याला यायचे असेल तर तो व्हिडिओ टाकून येतो का? हा वेडेपणा आहे. अशा व्हिडिओवर स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही. एकनाथ शिंदे हे आमचे मुख्यमंत्री आहेत. त्यांना आमचा पूर्णपणे पाठिंबा आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुकेश अंबानी यांना जीवे मरण्याची धमकी

यासोबतच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. ‘हा व्हिडिओ एका उत्साही पक्ष कार्यकर्त्याने पोस्ट केला होता, याविषयी चुकीचा अर्थ काढू नये, असे ते म्हणाले आहेत. तसेच चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यावेळी बावनकुळे म्हणाले की, “काही उत्साही कार्यकर्त्यांनी महाजनादेश यात्रेचा जुना व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे याबाबत गैरसमज करून घेऊ नये. मुख्यमंत्री शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि राहतील. त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली जाईल. केंद्रीय नेतृत्वासोबतच देवेंद्र फडणवीस यांनीही हेच सांगितले आहे. त्यामुळे कोणीही त्याचा चुकीचा अर्थ काढू नये. असे ते म्हणाले आहेत.

पाकिस्तान वर्ल्ड कपमधून बाहेर!

तत्पूर्वी देवेंद्र फडणवीस यांचा हा व्हिडिओ 4 वर्षे जुना होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हटले होते. त्यानंतर काल त्यांचा हा व्हिडिओ भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला होता. या व्हिडिओला कॅप्शन देताना असे लिहिले होते की, मी महाराष्ट्राच्या नव्या उभारणीसाठी परत येईन. मात्र, 2 तासांनंतर ही पोस्ट हटवण्यात आली.

One Comment on “‘मी पुन्हा येईन’ च्या व्हिडिओवर फडणवीसांचे स्पष्टीकरण”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *