प्रलंबित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या प्रस्तावाला अखेर मंजूरी!

बारामती, 27 ऑक्टोबरः प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) घटक क्र.4 (स्वमालकीच्या जागेवर घराची निर्मिती करणे) अंतर्गत महाराष्ट्र राज्यासाठी 29,508 घरकुले मंजूर झाली आहेत.
महाराष्ट्र राज्यातून एकूण 153 सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) करिता राज्य शासनाची मान्यता दि. 23 जून 2023 रोजी मिळालेली होती. केंद्र शासनाची दि. 18 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या केंद्रस्तरीय मान्यता व सनियंत्रण समिती, नवी दिल्ली (सीएसएमसी) मध्ये महाराष्ट्र राज्यातील एकूण 153 डीपीआर मंजूर करण्यात आले असून एकूण लाभार्थी संख्या 29,508 इतकी आहे. सदर डीपीआर करिता राज्य शासनाकडून रुपये 29,508 लक्ष व व केंद्र शासनाकडून रुपये 44,262 लक्ष असे एकूण 73,770 लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे.

इंग्लंडला श्रीलंकेने हरवले! वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडचा चौथा पराभव

बारामती नगर परिषदेकडून दि.1 ऑक्टोबर 2022 रोजी फेज 5 मध्ये 105 घरकुले तसेच दि. 24 नोव्हेंबर 2023 रोजी फेज 6 मध्ये 229 घरकुले असे एकूण 334 घरकुले शासनाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आली होती. सदर 334 घरकुलांना केंद्र शासनाची अंतिम मान्यता मिळाली आहे. सदर 334 घरकुलांना शासनाकडून रुपये 501 लक्ष इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त बौद्ध समाजाचा भव्य मेळावा

One Comment on “प्रलंबित प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) च्या प्रस्तावाला अखेर मंजूरी!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *