बारामती प्रशासनाकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन

बारामती, 28 मेः बारामती शहरातील प्रशासकीय भवनात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची आज, शनिवारी जयंती साजरी करण्यात आली. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्त उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तहसिल कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी तहसिलदार विजय पाटील, निवासी नायब तहसिलदार विलास करे यांच्यासह तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *