गुजरात, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) देशभरात सध्या नवरात्रीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अशातच एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. गुजरातमधील कपडवंज येथील 17 वर्षीय तरुणाचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना 20 ऑक्टोबर रोजी घडली. या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. वीर शाह असे या मुलाचे नाव होते.
35 हजार कोटींचा अखर्चित निधी विकासकामांसाठी वापरणार!
दरम्यान, वीर गरबा नृत्य करीत असताना त्याला अचानकपणे चक्कर आली. त्यामुळे तो बेशुद्ध पडला. त्यानंतर त्याला तात्काळ जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र त्यावेळी या तरुणाला डॉक्टरांनी मृत घोषित केले. वीर हा शारीरिकदृष्ट्या निरोगी होता. त्याच्या या अकाली निधनामुळे कुटुंबासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान वीरच्या मृत्यूनंतर गरबा आयोजकांनी गरबा नृत्याचा कार्यक्रम लगेचच बंद केला. त्यानंतर वीरच्या निधनाची बातमी त्याच्या वडिलांना देण्यात आली.
बारामतीत पुन्हा एकदा विमान कोसळले
धक्कादायक बाब म्हणजे, गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत तब्बल 10 जणांचा गरबा खेळताना मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 13 वर्षाच्या मुलापासून ते 55 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. अशा घटनांमुळे आरोग्य विभाग आता सतर्क झाले आहे. त्यांनी सरकारी रुग्णालये आणि स्थानिक रुग्णालयांना यासंदर्भात अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, गरबा आयोजकांना आपत्कालीन परिस्थितीत कार्यक्रमात जलद प्रवेश करण्यासाठी रुग्णवाहिकांसाठी कॉरिडॉर तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे अशा प्रकारच्या घटनांमुळे सध्या चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी गरबा खेळताना स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
2 Comments on “गरबा खेळताना 24 तासांत 10 मृत्यूची नोंद”