मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या

नांदेड, 22 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) मराठा आरक्षण आंदोलन संदर्भात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मराठा आरक्षण मिळावे, यासाठी आणखी एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शुभम सदाशिव पवार (24) असे या मृत तरुणाचे नाव आहे. तो नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील वडगाव येथील रहिवासी आहे. त्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. ही घटना काल (दि.21) घडली. दरम्यान त्याच्या मृतदेहाच्या शेजारी एक सुसाईड नोट सापडली आहे. यामध्ये त्याने मराठा समाजाला आरक्षण द्यावे , अशी मागणी केली आहे.

आफ्रिकेचा इंग्लंडवर 229 धावांनी विजय

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या आठवड्यातील मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची ही तिसरी घटना आहे. यापूर्वी 19 ऑक्टोंबर रोजी 45 वर्षीय सुनील कावळे यांनी आत्महत्या केली होती. त्यांनी देखील आपल्या सुसाईड नोटमध्ये मराठा आरक्षण देण्याची मागणी केली होती. तर काल (दि.20) पांडुरंग काळकुटे या तरुणाने मराठा आरक्षणाची मागणी करून स्वतःचे जीवन संपवले होते. तो बीडचा रहिवासी होता. दरम्यान, या आत्महत्यांच्या घटनांमुळे मराठा आरक्षणाच्या संदर्भातील आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

विनायक मेटेंच्या पुतण्याची आत्महत्या

मराठा आरक्षण संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 24 ऑक्टोबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. मराठा समाजाच्या मागण्या मान्य न झाल्यास 25 ऑक्टोबरला पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

One Comment on “मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाची आत्महत्या”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *