राज्यातील सीईटी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध

मुंबई, 21 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा (CET) सेलने MBA सह 20 इतर CET परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या सीईटी परीक्षा दरवर्षी राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर घेतल्या जातात. MHT सीईटी 2024 च्या परीक्षा 16 एप्रिल ते 5 मे दरम्यान घेण्यात येणार आहेत. यामध्ये राज्यातील MBA आणि MMS सीईटी 24 मार्च रोजी होणार आहे. तर, MCA सीईटी 30 मार्च रोजी होणार आहे. सीईटी सेलने या सीईटी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. तुम्ही या परीक्षांना बसणार असाल तर सीईटी सेलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. या व्यतिरिक्त तुम्ही ही सविस्तर बातमी वाचा.

दरम्यान, या परीक्षांसाठी जानेवारीमध्ये नोंदणी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. तर परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या एक आठवडा आधी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केले जाऊ शकते. त्यानंतर उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन डाउनलोड करता येईल. तसेच या परीक्षांचे निकाल मे-जूनमध्ये एक एक करून जाहीर केले जातील.

बीएड एमएड, 3 वर्षीय इंटीग्रेटेड कोर्स परीक्षा – 2 मार्च
मेड सीईटी परीक्षा: 2 मार्च
एमपीएड सीईटी परीक्षा : 9 ते 10 मार्च
एलएलबी 3 वर्षीय सीईटी: 11 ते 13 मार्च
बीपीएड-सीईटी 15 मार्चफील्ड टेस्ट: 16 ते 18 मार्च
बीएड (जनरल आणि स्पेशल): 18 ते 21 मार्च
एमबीए/एमएमएस सीईटी: 23 ते 24 मार्च
एमसीए सीईटी: 30 मार्च
डिजाइन सीईटी: 6 एप्रिल
एम आर्च सीईटी: 7 एप्रिल
एम एचएमसीटी सीईटी: 7 एप्रिल
बी एचएमसीटी सीईटी: 13 एप्रिल
बी प्लॅनिंग सीईटी: 13 एप्रिल
MHTCET परीक्षा: 16 एप्रिल ते 2 मे
बीए/बीएससी बीएड (चार वर्षीय अभ्यासक्रम) सीईटी: 6 मे
एल.एल.बी. (5 वर्षे अभ्यासक्रम) सीईटी: 7 ते 8 मे

One Comment on “राज्यातील सीईटी परीक्षांचे वेळापत्रक प्रसिद्ध”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *