मुंबई, 20 ऑक्टोबरः (विश्वजीत खाटमोडे) आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेची सध्या उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत अतिशय चांगली कामगिरी बजावली आहे. आता या विश्वचषकातील पुढचा सामना उद्या (21 ऑक्टोंबर) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. हा सामना इंग्लंड विरूद्ध दक्षिण आफ्रिका या बलाढ्य संघांमध्ये रंगणार आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस सज्ज झाले आहेत. यासाठी मुंबई पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. त्यानूसार, पोलिसांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.
वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे दि. २१ व २४ ऑक्टोबर आणि ०२, ०७ व १५ नोव्हेंबर रोजी क्रिकेट विश्वचषक २०२३ चे सामने पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांना सूचना#क्रिकेटविश्वचषक२०२३ pic.twitter.com/nwfVR847T1
— मुंबई पोलीस – Mumbai Police (@MumbaiPolice) October 20, 2023
देशातील पहिल्या रॅपिडेक्स ट्रेनचे उद्घाटन
वानखेडे स्टेडियमवरच्या परिसरामध्ये पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे प्रेक्षकांनी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. स्टेडियममध्ये येताना प्रेक्षकांनी कोणत्याही प्रकारच्या बॅग्स, कॉईन, धातूच्या वस्तू, पाण्याच्या बाटल्या आणि ज्वलनशील पदार्थ आणू नये. तसेच सामन्याची तिकिटे अधिकृत वेबसाईट वरूनच खरेदी करावीत, असेही पोलिसांनी यावेळी म्हटले आहे. तर प्रेक्षकांनी यांसारख्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुंबई पोलिसांनी केले आहे.
भाजप आमदाराची वेबसाईट हॅक! लावला पाकिस्तानचा झेंडा
दरम्यान, या आयसीसी विश्वचषक स्पर्धेत वानखेडे स्टेडियमवर यंदा दि. 21 व 24 ऑक्टोबर आणि 02, 07 व 15 नोव्हेंबर रोजी क्रिकेट सामने होणार आहेत. तर या मार्गदर्शक सूचना वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सर्व सामन्यासाठी असणार आहेत.
One Comment on “वानखेडे मैदनावरील सामन्यांआधी पोलिसांच्या मार्गदर्शक सूचना”