डुब्लिकेट!

अभ्या-ः काय संभ्या, आज एसएन बापुंच्या तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष पदी निवड झाली.
संभ्या-ः काय जोक करतोय! राष्ट्रवादीचा अध्यक्ष तर संभाजी नाना हाय.
अभ्या-ः नाना दादा गटाचा आणि बापु साहेब गटाचा.
संभ्या-ः म्हंजे, दोन गट पडलंय व्हय!
अभ्या-ः दोन गट? अरं तट पडलंय तट!
संभ्या-ः कोण म्हणतंय फुट नाय…, फुट नाय…, फुट नाय… नेतृत्व बदल हाय.
अभ्या-ः मग कोर्टात कशाला गेल्यात?
संभ्या-ः कोर्टात कशाला गेल्यात म्हंजी?
अभ्या-ः सत्तेचा मलिदा ताटात का वाटीत, ह्यो प्रश्न त्यामुळे ‘चीत भी मेरा आणि पट भी मेरा’
संभ्या-ः चुलता- पुतण्याच्या भांडणात ताईची ससे-होळपट.
अभ्या-ः काय न्हाय रं, सगळं मॅनेज हाय.
संभ्या-ः न्हाय मॅनेज न्हाय! साहेबांना बारामती शहरासाठी अजून माणून मिळानाय आणि दादा फ्रंट फुटवर हाय.
अभ्या-ः असं हाय काय! म्हणून तर “कमिशनर मॅडम” मधून दादांवर पुण्याच्या मध्यवर्ती ठिकाणचा जमीनीचा वाद तर बाहेर काढला नाहीना!
संभ्या-ः साहेबाचं काय सांगता येत न्हाय! रोहित शेठवर गेम झाली म्हणून दादांच्या अडचणीत वाढवायचं काम साहेब करत असत्याल.
अभ्या-ः तसं न्हाय रं! सगळ्यांची अंडी पिल्ली सगळ्यांना माहित हाय रं. काय जरी खाल्लं तरी एकाच पोटात जाणार, ताटात असू नाहितर वाटीत असू शेवट पवारच खाणार.
संभ्या-ः आणि कार्यकर्ते उपाशी राहणार! चल निघतो.

2 Comments on “डुब्लिकेट!”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *