अजित पवार यांच्या विमान अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर

Ajit Pawar विमान अपघात अहवाल

बारामती, 28 जानेवारी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा आज (दि.28) सकाळी अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचे दुर्दैवी निधन झाले आहे. बारामती विमानतळाजवळ झालेल्या या भीषण अपघाताबाबतचा प्राथमिक अहवाल समोर आला आहे.

https://x.com/i/status/2016458492924862758

पहा अहवालात काय म्हटले?

नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) च्या अहवालानुसार, या अपघातावेळी विमान धावपट्टीवर उतरत असताना गंभीर अडचण निर्माण झाली आणि त्यातून हा अपघात घडला. असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.



प्राथमिक अहवालानुसार, 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8.18 वाजता विमानाचा बारामती विमानतळाशी पहिला संपर्क झाला. पुणे येथील हवाई नियंत्रण विभागाकडून विमानाला हवामान ठीक असल्याने थेट उतरता येईल, असा सल्ला देण्यात आला होता. त्या वेळी वारा शांत होता आणि सुमारे 3000 मीटरपर्यंत स्पष्ट दिसत होते.



विमानाने धावपट्टी क्रमांक 11 वर उतरण्याचा पहिला प्रयत्न केला, पण धावपट्टी नीट दिसली नाही. त्यामुळे वैमानिकांनी विमान पुन्हा वर नेऊन एक फेरी घेतली. दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी दिसत असल्याचे त्यांनी सांगितले आणि 8.43 वाजता उतरण्याची परवानगी मिळाली.

मात्र, त्यानंतर अवघ्या काही क्षणांतच धावपट्टीजवळ आग लागल्याचे लक्षात आले आणि हा अपघात झाला. 8.44 वाजता आपत्कालीन मदत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातानंतर विमानाचे अवशेष धावपट्टीच्या डाव्या बाजूला आढळून आले.

प्राथमिक अहवालानुसार, विमानाची सर्व कागदपत्रे वैध होती आणि वैमानिक अनुभवी होता. त्यामुळे अपघात नेमका कशामुळे झाला? हे जाणून घेण्यासाठी आता विमान अपघात तपास यंत्रणेकडून सखोल चौकशी सुरू आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर अधिक माहिती जाहीर केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *