अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या बारामतीत अंत्यसंस्कार

Ajit pawar अजित पवार

बारामती, 28 जानेवारी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज (दि.28) सकाळी विमान अपघातात दुर्देवी निधन झाले आहे. अजित पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि.29) सकाळी 11 वाजता बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या संदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर अंत्यसंस्कार

अजित पवार यांच्या प्रार्थिवावर बारामतीतील विद्या प्रतिष्ठान मैदान येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडणार असून, यासाठी सध्या तयारी करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या अंत्यविधीसाठी देशभरातील अनेक राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.

मोदी शहा उपस्थित राहणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हेही अजित पवार यांच्या अंत्यसंस्कार विधीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विविध पक्षांचे नेते, मंत्री, खासदार, आमदार तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि लाखो कार्यकर्ते बारामतीत दाखल होण्याची शक्यता आहे.



दरम्यान, मुंबईहून बारामतीकडे येत असताना झालेल्या चार्टर्ड विमान अपघातात अजित पवार यांच्यासह 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, राज्य सरकारकडून तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

अजित पवार यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली असून, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. एका अनुभवी, रोखठोक आणि जनतेशी थेट नाते असलेल्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *