बारामती, 5 नोव्हेंबरः स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकींचे बिगुल वाजले असतानाही बारामती लोकसभा मतदार संघातील निवडणुकीची तयारीला ब्रेक लागला आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष शेखर ओढणे यांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून भाजपमधील अंतर्गत कलहामुळे जिल्ह्यातील अनेक मंडल अध्यक्षांना काम थांबविण्याचे सूचना मिळाल्याचे समजते. प्रामुख्याने बारामती तालुक्यात राष्ट्रवादी धार्जीन काही स्वःघोषित भाजप नेते राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाच्या ज्येष्ट नगरसेवकाच्या संपर्कात असून बारामती नगर परिषद सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणूक २०२५ भाजपने लढवू नये, यासाठी मुंबईमध्ये ठाण मांडून बसले आहेत. ज्या नेत्याच्या मोटार सायकलवर एकही कार्यकर्ता बसत नाही, असे स्वःघोषित भाजप नेते बारामतीच्या भाजपची सुत्रे स्वतःकडे मिळावीत म्हणून पक्षाची वाढ खंटविण्याचे काम सध्या चालू आहे. जिल्हाध्यक्षाच्या स्पर्धेतून प्रदेशाने फेकून दिल्यानंतर अपमानीत झालेल्या स्वःघोषित भाजप नेत्याने जिल्हाध्यक्षांना कामात अडचणी निर्माण करून लागलेला आहे. ऐन निवडणुकींच्या काळात माळेगावातील डब्बल डुलकी माजी चेअरमनला हाताशी धरून पक्षामध्ये पक्षश्रेष्टींबद्दल नकारात्मक अपप्रचार करून पक्षाला नस्तनाबुत करण्यासाठी या दोन नतदृष्टे पक्षामध्ये या नगरपरिषद व नगर पंचायत सार्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीत पक्षांतर्गत शह करण्याचे राजकारण करून निष्टावंत व कार्यक्षम कार्यकर्त्यांना बदनाम करण्याचे काम ही चांडाल चौकटी करत आहे. बारामती व माळेगावच्या नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीबद्दल वरिष्ठांना नकारात्मक चुकीची माहिती देऊन चाटूगिरी करणाऱ्या कार्यकर्त्यांना पदांच्या माळा घालण्यासाठी हे लोक प्रयत्नशील असून या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये भाजपचे भविष्य अंधकारमय आहे.

निवडणूक पुर्व कुठही तयारी होऊ नये व या संबंधी जिल्हाध्यक्षावर दबाब आणून खोट्या प्रतिष्ठे पायी पक्षाच्या नेत्यांना हाताशी धरून राजकीय बळी घेण्याचा व देण्याचा ही डब्बल डुलकी मंडळी येत्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपल्या पदरात कमाईचे पद पडावे म्हणून राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांना खूश करण्यासाठी भारतीय जनता पार्टीला पुणे जिल्ह्यातून नस्तनाबुत करण्यासाठी ठेका घेतल्याची चर्चा पुणे जिल्हा ग्रामीण भारतीय जनता पार्टच्या कार्यकर्त्यांमध्ये चालू आहे. या पक्षवृद्धी हालचाली व कृत्यांसंबंधी बारामती तालुक्यातील जुने जानते कार्यकर्ते व युवक वर्ग यांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची वेळ घेतली असून त्यांच्या समक्ष या विषयावर चर्चा करणार असून निवडणूक लढवायची की नाही, या बद्दलचा अंतिम निर्णय येत्या दोन दिवसात घेण्याचे भाजप कार्यकर्त्यांनी भारतीय नायकच्या प्रतिनिधीला सांगितले आहे.

Related