माळेगाव नगरपंचायत निवडणूक 2025

माळेगाव, 5 नोव्हेंबरः

1) राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्याकडे उमेदवारांची जत्रा
2 )राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये पळापळ
3) भाजपा निवडणुकीतून माघार घेणार?
4) आर पी आय आठवले गट दोन दिवसात नगर अध्यक्ष चा उमेदवारासह 50 टक्के जागा जाहीर करणार
5) कुणबी मराठा व ओबीसी मधील संघर्ष अटळ



माळेगाव नगरपंचायत सार्वजनिक निवडणूक 2025 याची घोषणा झाली असून निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही निवडणूक ऐतिहासिक असून प्रथमच नगरपंचायत मधून येथील मतदार मतदान करणार आहेत. त्यामुळे नगर पंचायत समिती कोणाचा नगर अध्यक्ष होणार? यावर अनेक दिग्गज प्रतिष्ठित आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. या निवडणुकीला माळेगाव साखर कारखान्याचा निवडणुकीची पार्श्वभूमी असल्याने जिंकणे आणि पाडणे या दोन्ही अंगाने ही निवडणूक चुरशीची होणार आहे. या निवडणुकीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मोठा उत्साह असून निवडणूक तिकीट मागणाऱ्या ची गर्दी ही गर्दी खूप आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये बंडखोरीची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी एबी फॉर्म वितरित झाल्यानंतरच राष्ट्रवादीचे उमेदवार निश्चित होतील त्यापूर्वी उमेदवाराची उमेदवार यादी जाहीर होणे कठीणच आहे. बंडखोरी झाल्यास माळेगावची राजकीय चित्र बदलेल माळेगावचे राजकीय कारभारी गावाबाहेरचा नसावा ही भूमिका अनेक माळेगावकरांनी व्यक्त केली आहे.




राष्ट्रवादी शरद पवार गटामध्ये अस्वस्थता असून, स्वबळावर निवडणूक लढण्याची क्षमता नसल्याने व कारखान्यातल्या पराभव ज्वारी लागल्याने मानसिक खच्चीकरण झाले आहे. सर्व समावेशक गाव पातळीवरचा पॅनल विभाग करण्यासाठी काही मात्र भार मंडळी प्रयत्न करत असून नेतृत्वाचा प्रश्नावरून आघाडीची साधू मोड होत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गट कोणाबरोबर तरी स्थानिक तडजोड करून माळेगाव हद्दीत पक्ष जिवंत असल्यास आभासी चित्र निर्माण करण्याचा केविल वाणी प्रयत्न केला जात आहे. भारतीय जनता पार्टी माळेगाव ही अंतर्गत कलाने ग्रासली असून माळेगाव कारखान्याचा माजी चेअरमन व इतर कार्यकारणींमध्ये उभी दरात पडली आहे. कारखान्याचा माजी चेअरमन यांना पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष बदल ल्या संबंधित षडयंत्र केल्याचे आरोप केले जात आहे. तसेच माळेगाव मंडळाचा अध्यक्षांना पाय उतार करण्यासाठी खूप व्यक्त केलेल्या चर्चा माळेगावात आहे. माळेगावात भारतीय जनता पार्टीमध्ये तीन-चार गट असून या गटाचा समन्वय बौद्ध असल्याने माळेगाव पंचायत निवडणूक लढणार की नाही? हाच प्रश्न माळेगावकरांना पडला आहे.




आरपीआय आठवले गटाने माळेगाव नगरपंचायत निवडणुकीत आघाडी घेतली. तर बोलली जात असून दोन दिवसात नगर अध्यक्षपदाचे उमेदवार व 50 टक्के नगरसेवक पदाचे उमेदवार घोषित करणार असल्याचे सांगितले. माळेगावात विविध सामाजिक संघटना बचत गट महिला मंडळी यांच्याशी चर्चा वली मत चालले असून सर्व स्तरातील सर्व जाती पंथातील योग्य ते प्रतिनिधी देऊन गावका स्थानिक गावकऱ्यांच्या मार्फतच केले जाईल, असे आश्वासन आठवले गटाने दिले आहे. माळेगाव गाव हे बारा बोलोतेदारांचे असून या गावाला विशिष्ट राजकीय परंपरा आहे.


या गावात गावाची राजकीय व आर्थिक सत्ताही प्रामुख्याने तीन समाजाकडे केंद्रित झाली असून, उर्वरित बहुसंख्य मतदार हे या तीन समाजाशिवाय राजकीय नवीन मार्ग शोधत आहेत. मराठा समाज हा केंद्रस्थानी असून त्याची मतदार संख्या ही लक्षणीय आहे. सर्व आर्थिक सत्ता केंद्र ही याच समाजाकडे आहेत. पोस्ट काय कायदा डेरी चालक मालक अशा विविध अर्थ केंद्र यात समाजाकडे आहे. धनगर समाज हा या परिसरातील सर्वात मोठा लोकसंख्येने व मतदाराचा दृष्टिकोनातून बहुसंख्य असल्याचे मतदार संख्येचा व लोकसंख्येचा प्रमाणात यांना आर्थिक व राजकीय संधी मिळत नाही. त्यातच आता नव्याने हा धनगर व मराठा पट्ट्यामध्ये घुसखोरी करत असून, त्यामुळे या निवडणुकीत सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे व आर्थिक व्यवहार मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता आहे. निवडणूक पुढे जाईल तसे सरडे रंग बदलून देशांतर्गत करून पक्षांतर करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *