बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत ओबीसींचा राजकीय मुडदा पाडणार कुणबी!!

बारामती, 30 ऑक्टोबर: बारामती सार्वत्रिक निवडणूक 2025 ची निवडणुकीचा रंग धुमाळी चालू झाले असून, बारामतीतील असंख्य इच्छुकांनी ओबीसी व ओपन मधून निवडणुकीची तयारी केली आहे. यातून मूळ ओबीसींना देशोधडीला लावण्याचे काम कुणबी प्रमाणपत्र करणार आहे. दुहेरी सवलत घेणाऱ्या राजकारणामध्ये ओबीसींना चिटपत करणारे षडयंत्र बारामती नगर परिषद मध्ये चालू असून, या निवडणुकीमध्ये ओबीसी विरुद्ध कुणबी हीच लढाई प्रामुख्याने दिसणार आहे.

बारामती नगरपरिषद हद्दीतील असंख्य जण धनदांगडे व्यापारी, बिल्डर, गुंठामंत्र्यांनी पुढे प्रमाणपत्र काढून ओबीसींच्या जागेवर सांगण्यास सुरुवात केलेली आहे. पिढ्या न् पिढ्या ज्यांनी या ओबीसींना शूद्र लेखन त्यांच्यावर मानहानी केली, त्यांचे शोषण केले, असे लोक आता ओबीसींच्या जागा हिसकावून घेऊन बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आपल्या जातीचा टक्का वाढवणारा आहे. बारामती नगर परिषद हद्दीत ओबीसींमध्ये प्रामुख्याने धनगर समाज, माळी समाज, मुसलमान समाज, वंजारी समाज, वडारी समाज, तेली समाज या समाजाचे भरघोस मतदान असतानाही या निवडणुकीमध्ये त्यांना डावलून प्रस्थापित राजकारणी व धनदांगडे कुणबी राजकीय सत्ता हस्तांतरित करणार, हस्तगत करणार!



त्यामुळे कालपर्यंत बारामती नगर परिषद निवडणुकीमध्ये दोन चार कुटुंब ओबीसीची सोडले (प्रामुख्याने बनकर, पोटे, हिंगणे) तर ओबीसी मधून वडार समाज निवडणूक लढत होते. कैकाडी समाज, कोलाटी समाज हे देखील राजकीय दृष्ट्या ओबीसी असल्याने तेही निवडणूक लढत होते. परंतु आता बारामती नगर परिषद हद्दीतील राजकीय अभिलाषा बाळगणारे नव्याने कुणबी म्हणून उदयाला आलेले हे मूळ इतर मागासवर्गीय जागांवर निवडणूक लढवून मराठा व मराठा कोण आहे? दुहेरी राजकीय लाभ घेऊन बारामतीतील जातीय सलोखा राजकीय वाटण्या एकमेकांना देणार नाहीत.



संबंध नातेसंबंध त्यामुळे 40 ते 50 टक्के असणारे ओबीसी आता या निवडणुकीमध्ये दोन टक्के प्रतिनिधित्व मिळालं तरीही पुरेसे आहे, असे म्हणणारे राजकीय पिल्लावळ दलाल बारामती मध्ये फिरत आहे. त्यामुळे निवडणुकीमध्ये खरे ओबीसी विरुद्ध नव्याने झालेले कुणबी ओबीसी यांच्यात खरी राजकीय लढत आहे. मतदारात अल्पसंख्याक संख्या असणारे मराठा व मराठा कुणबी हे नगराध्यक्ष पदावर व ओबीसी नगरसेवक व सर्वसाधारण नगरसेवक पदावरती आपला दावा सांगण्यास तयार असून त्या पद्धतीचे राजकीय रणनीती विविध विशिष्ट जातीच्या संघटना एकत्र येऊन खलबत्ता करत आहे.

आर्थिक दृष्ट्या शैक्षणिक दृष्ट्या व धनिक असणारे बांधकाम व्यावसायिक, पैशाने मोठे असणारे हे सर्व लोक उद्या खऱ्या ओबीसींच्या मुळावर उठले नाही तर नवलच होईल. त्यामुळे आपल्या हक्क आणि अधिकाराचं कारण आपल्या राजकीय वरिष्ठांकडे सुस्पष्ट समजेल असे भाषेत सांगितले पाहिजे, अन्यथा तुमचे राजकीय हक्का आणि अधिकार हिरावून घेतल्या शिवाय राहणार नाही. पाडण्याचं अवसान तर तुमच्यात नाहीच नाही आणि एकोपा ही नाही. दुसऱ्याच्या राजकीय झाडांवर मांडूळ म्हणून राजकीय आयुष्य जगणाऱ्या तुमच्यासारख्या निच वृत्तीच्या असंख्य राजकीय पुढार्‍यांना स्वाभिमानाची जाणीव व्हावी व पुढच्या पिढीचे राजकीय अधिकार अबाधित राखावे.

आम्हाला राजकीय आरक्षण नको नको म्हणत असंख्य मराठा कुणबी यांनी आता प्रत्यक्ष राजकीय सवलती लाटून घेण्यास जबरदस्तीने प्रयत्न चालू आहेत. काही ठिकाणी हे प्रयोग यशस्वी झाल्याने आता मनोधैर्य वाढले आहे. तसेच महाराष्ट्राच्या राजकारणात यांचे राजकीय पकड असल्याने खरे ओबीसी राजकीय दृष्ट्या संपुष्टात येणार हे उद्याच्या सार्वत्रिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *