बारामती, 18 ऑक्टोबर: (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) भारतीय जनता पार्टीच्या दक्षिण मंडल अध्यक्ष सुनील माने यांनी आज (दि.18) आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक वडगांव निंबाळकर भाजपा कार्यालयात घेऊन सर्व पदाधिकारी यांची मते जाणून घेतली.


या बैठकीत सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती जागा भाजपा लढवेल. अशी मागणी वरिष्ठांना सादर करण्यात यावी, अशी मागणी सर्वांनीच अध्यक्ष सुनील माने यांच्या कडे केली आहे.

या बैठकीत मा. अध्यक्ष पिके जगताप सरचिटणीस दर्शन गोंलाडे बापू फणसे, मा. अल्पसंख्याक पुणे जिल्हा अध्यक्ष खालील काझी, अनुसूचित जाती मोर्चा बारामती तालुका भाजपा उमेश गायकवाड, पुणे जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष दिग्विजय काकडे बाळासाहेब बालगुडे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. विनायक माहाडीक पदवीधर मतदार संघाचे समन्वयक उपस्थित होते.


