नीरा मोरगाव रस्त्यावरती मोटरसायकलचा अपघात अपघातामध्ये मोटरसायकलस्वार जखमी

बुलढाणा जिल्ह्यात तीन वाहनांचा अपघात

बारामती, 12 ऑक्टोबर, प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे: मोरगाव कडून मिरच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलचा (गाडी नंबर – एम एच 11 बीजे 9195) खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे शनिवार (दि.11) रात्री साडेआठच्या सुमारास अपघात झाला असून अपघातामध्ये प्रवीण काटकर नावाची व्यक्ती गंभीररित्या जखमी झालेली आहे. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांना मूर्ती येथील प्राथमिक उपचार केंद्रामध्ये तातडीने दाखल करण्यात आले. सदर व्यक्ती ही मोरगाव कडून साखरवाडी पिंपळवाडी या गाव निघालेली होती.



तरी रात्री साडेआठच्या सुमारास मूर्ती ते मोरगाव बालगुडे वस्ती नजीक बाबाच्या विहिरीजवळ खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे मोटरसायकल चा तोल जाऊन मोटरसायकल सार मुंडक्यावरती आढळला. त्याला गंभीर स्वरूपाचा मार लागलेला होता. तरी नागरिकांनी तातडीने मूर्ती येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची गाडी बोलून त्या व्यक्तीला उपचार करण्यासाठी घेऊन गेले. यावेळी तेथे उपस्थित बाळासाहेब बालगुडे सनी बालगुडे व दूध संघाचे माजी उपसभापती वैभव मोरे सतीश शिंदे व इतर अनेक नागरिक अपघात झाल्याचे कळले असता अपघात काळी पोचून त्या व्यक्तीला दवाखान्यांमध्ये तात्काळ मदत होईल या उद्देशाने सर्वांनी मदत केली.



अपघात इतका गंभीर होता की अपघातामध्ये मोटरसायकल स्वराचे प्राण गमावण्याची दाट शक्यता होती. परंतु सदैव आणि तो वाचला सार्वजनिक बांधकाम खात्याचे नीरा ते मोरगाव या रस्त्यावरती खूप दिवसापासून लक्ष नसून रस्त्यावरती जागोजागी खड्डे पडलेले असून सुद्धा खड्डे मोजण्यासाठी कुठल्याही प्रकारची यंत्रणा राबवण्यात येत नाही. तरी मूर्ती ते मोरगाव या रस्त्यावरती वारंवार अपघात घडत आहेत, याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.



बालगुडे वस्ती येथील कॉर्नर व चौधरवाडी कॉर्नर व मोडवे कॉर्नर हे कॉर्नर ची उंची कमी करण्यासाठी वारंवार सांगून सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष न देता डोळे उघडझाप करत आहेत. यामुळे कित्येक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत रस्त्याला साईट पट्टी नाही व रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून, ते पुन्हा करण्यात यावे अशी मागणी बाळासाहेब बालगुडे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *