बारामतीच्या ऋग्वेदची आतंरराष्टीय तायक्वोंदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

बारामती, 28 ऑगस्टः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) दक्षिण कोरिया देशातील मुजु येथे नुकताच आंतरराष्ट्रीय तायक्वोंदो कल्चर एक्स्पो तायक्वोंदो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत बारामती तालुक्यातील मुर्टी येथील ऋग्वेद अभिजीत नलावडे याने घवघवीत यश संपादन केले. ऋग्वेदने तायक्वोंदोच्या फुमसे प्रकारात सुवर्ण तर फाईट या प्रकारात रौप्य पदकाची कामगिरी केली आहे.

पुरंदर उपसा सिंचन योजनेतून अवैधरित्या पाणी कनेक्शन

या स्पर्धेत दक्षिण कोरिया, चीन, भारत, इराण, नेपाळ, श्रीलंका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्थान, ब्राजिल आदींसह इतर एकुण 24 देशातील मुलांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत साधारण 4000 ते 4500 मुलांनी विविध प्रकारामध्ये सहभाग नोंदविला होता.

दरम्यान, ऋग्वेद हा गेले दोन वर्षे सासवड येथील श्रीलक्ष्य तायक्वोंदो असोशिएशन या क्लब अतर्गंत जयदिप मंगल कार्यालय, सासवड येथे प्रशिक्षक किरण गायकवाड व माधुरी गायकवाड यांच्या मार्गदर्शानाखाली प्रशिक्षण घेत आहे. ऋग्वेद यांचे आजोबा लालासाहेब एकनाथ नलावडे हे सोमेश्वर कारखान्याचे माजी संचालक व राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आहेत. तसेच वडील नामांकित उद्योजक व आई गृहिणी आहे. जागतिक स्तरावर केलेल्या उत्कृष्ट कामगिरीनंतर ऋग्वेदवर सर्वच स्तरावरून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

बारामतीतील कचरा डेपो पेटला; करोडोंच्या मशीनी जळाल्या!

One Comment on “बारामतीच्या ऋग्वेदची आतंरराष्टीय तायक्वोंदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *