पुरंदर उपसा सिंचन योजनेतून अवैधरित्या पाणी कनेक्शन

बारामती, 25 ऑगस्टः (प्रतिनिधी- बाळासाहेब बालगुडे) बारामती तालुक्यात पुर्वेकडील पट्टा हा नेहमी बागयत पट्टा म्हणुन ओळखला जातो, तर दुसरीकडे बारामतीच्या पश्चिम पट्टा हा कोरडा पट्ट्यात वर्षानुवर्षे पाण्याची किल्लत भासत असते. यामुळे बारामती तालुक्यातील मुर्टी, मोडवे, मासाळवाडी, पळशी, लोणीभापकर, करडोली, मुडाळे, आदी गावे पुरंदर उपचा सिंचन योजनेतून थोड्या फार प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात येतो. मात्र सदर पाईपलाईनमधून बारामती तालुक्यातील मोरगाव हद्दीत अवैधरित्या घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तसेच सदर कनेक्शन हे दुसऱ्या व्यक्तीच्या नावाने घेण्यात आले असून यात काही संबंधित अधिकाऱ्यांचाही हात असल्याचे स्थानिकांकडून दबक्या आवाजात बोलले जात आहे.

बारामतीतील कचरा डेपो पेटला; करोडोंच्या मशीनी जळाल्या!

सदर अवैध कनेक्शन घेते वेळी काही धन दांडगे लोक बळ जबरीने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करून जबरदस्तीने रस्ता खोदून पाईपलाईन घेत आहेत. सदर पाईपलाईन ही लोणी भापकर ते जोगवडी रोड खोदून करण्यात आले आहे. दरम्यान, लोणी भापकर ते जोगवडी रस्त्याचे दोन ते तीन दिवसांपूर्वीच डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र सदर रस्ता खोदताना कोणतीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे स्थानिकांकडून बोलले जात आहे. यामुळे अवैधरित्या खोदलेल्या संबंधित धन दांडग्या लोकांवर सार्वजनिक बांधकाम विभाग कारवाई करेल का? अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे.

लोणी भापकर ते जोगवडी हा रस्ता अंदाजे दीड ते दोन कोटी रुपये खर्चून पुर्ण करण्यात आले. मात्र संबंधित व्यक्तीकडून अधिकाऱ्यांना हाताशी धरून बेकायदेशीररित्या हा कोट्यावधीचा रस्ता खोदून सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले. सदर प्रकारबद्दल संबंधित अधिकाऱ्याशी भारतीय जनता पार्टीचे उद्योग आघाडी सचिव बाळासाहेब बालगुडे यांनी संपर्क साधला असता त्यांनी प्रथम उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यानंतर बाळासाहेब बालगुडे यांनी जिल्हा परिषदेचे बांधकाम अधिकारी जी. लडकत यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला. लडकत म्हणाले की, ‘आजपर्यंत कोणत्याही शेतकऱ्यावर अशी कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही, मी तपासून बघतो आणि नंतर सांगतो’, असे सांगितले.

स्पीड पोस्ट कॉउंटरसाठी युवा क्रांती जनकल्याण संघटनेची मागणी

दरम्यान, अशा प्रकारे पुरंदर उपसा सिंचन योजनेतून पाण्याचे बेकायदेशीर बोगस कनेक्शन घेतल्याने लाभार्थी शेतकऱ्यांना पाणी पुरवठा हा कमी पडतो. यामुळे योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांची पिके जळून जात आहेत. तसेच काही अधिकाऱ्यांकडूनही अशा बोगस कनेक्शनधारकांना पैसे घेऊन अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यात येत असल्याचेही स्थानिक शेतकऱ्यांकडून दबक्या आवाजात बोलले जात आहे. यामुळे अतिरिक्त पाणी सोडण्यासाठी गावागावत मध्यस्थी तयार झाले असून योजनेतून पाणी आणण्यासाठी शेतकऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशातून वरची मलई खाल्ली जात असल्याचे प्रकार सध्या घडत आहेत. यामुळे संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होईल का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.

One Comment on “पुरंदर उपसा सिंचन योजनेतून अवैधरित्या पाणी कनेक्शन”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *