स्पीड पोस्ट कॉउंटरसाठी युवा क्रांती जनकल्याण संघटनेची मागणी

बारामती, 22 ऑगस्टः ऐन सणासुदीचा काळ आणि रक्षा बंधनाच्या पार्श्वभूमीवर बारामती शहरातील नवीन पोस्ट येथे पत्र व्यवहार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी वाढताना दिसत आहे. या गर्दीत खास करून महिला वर्गाची लक्षणीय संख्या दिसत आहे.

नायलॉन मांजामुळे तीनजण मरता मरता वाचले!

स्पीड पोस्टने आपल्या नातेवाईकांना स्पीड पोस्टने पत्र व्यवहार करण्यासाठी ही गर्दी दिसून येत आहे. तसेच राखी आणि भेट वस्तू पाठवण्यासाठीही महिलांची गर्दी होताना दिसत आहे. या वाढत्या गर्दीत महिला वर्गाला तासंतास रांगेत ताठकळत उभे राहावे लागत आहे. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये एकच कॉउंटर असल्याने कर्मचाऱ्यावरही ताण येत आहे.

बारामतीत घरफोडी करणाऱ्यांचा व्हिडिओ आला समोर!

महिलांची गैरसोय टाळावी, या हेतूने पोस्ट ऑफिसमधील कॉउंटरची संख्या वाढवावी, अशी मागणी युवा क्रांती जनकल्याण संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीचे निवदेन युवा क्रांती जनकल्याण संघटनेच्या वतीने संघटनेचे सचिव महंमद शेख यांनी पोस्ट मास्टर यांनी दिले आहे.

One Comment on “स्पीड पोस्ट कॉउंटरसाठी युवा क्रांती जनकल्याण संघटनेची मागणी”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *